'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणं होणार रिक्रिएट, टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटासाठी झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:26 PM2023-09-21T12:26:44+5:302023-09-21T12:28:26+5:30

टायगर श्रॉफ-कृती सेनॉन यांच्या गणपत चित्रपटासाठी 'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणे  रिक्रिएट केले जाणार आहे.

Amitabh Bachchan Sara Jamana To Be Recreated In Tiger Shroff Kriti Sanon Ganpat | 'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणं होणार रिक्रिएट, टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटासाठी झाली निवड

tiger Shroff

googlenewsNext

अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'याराना' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटातील पात्र, कथानक व गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या चित्रपटातील एक गाणं नव्याने भेटीला येणार आहे. या गाण्याचं नाव आहे 'सारा जमाना'.  टायगर श्रॉफ-कृती सेनॉन यांच्या गणपत चित्रपटासाठी 'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणे  रिक्रिएट केले जाणार आहे.


'याराना' हा चित्रपट 1981 मध्ये आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिकेत आहेत. आता गणपत चित्रपटात अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या गाण्यात अमिताभची भूमिका आहे की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. 'सारा जमाना' हे गाणे निर्मात्यांनी चित्रपटातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्याचा वापर केला आहे. चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी हे गाणे लाँच केले जाईल. 

'गणपत'  हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.  टायगर श्रॉफने गणेशचतुर्थीनिमित्त या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तसेच त्याच्या हातावर एक लाल रंगाची पट्टी बांधलेली दिसत आहे. पोस्टर शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे,"उसको कोई क्या रोकेगा...जब बाप्पा का है उसके हाथ...आ रहा है गणपत...करने एक नई दुनिया की शुरुआत...या दसऱ्याला म्हणजेच 20 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होईल". 


गणपत' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल.  टायगर श्रॉफ आणि कृती सेनन या सिनेमाच्या माध्यमातून ते नऊ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. याआधी 'हीरोपंती' या सिनेमात ते एकत्र झळकले होते. 'हीरोपंती' हा दोघांचाही पहिला सिनेमा होता. 


टायगर श्रॉफने 2012 साली हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.  ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी 2’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘वॉर’, ‘बागी 3’, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटांत त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. टायगर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: Amitabh Bachchan Sara Jamana To Be Recreated In Tiger Shroff Kriti Sanon Ganpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.