​ट्विटरवरही बॉलिवूडचे शहेंशाह अमिताभच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 10:08 PM2016-12-17T22:08:39+5:302016-12-17T23:01:32+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांची लोकप्रियता ठरविता येऊ शकते. ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या ...

Amitabh Bachchan Shah Rukh Khan on Twitter! | ​ट्विटरवरही बॉलिवूडचे शहेंशाह अमिताभच!

​ट्विटरवरही बॉलिवूडचे शहेंशाह अमिताभच!

googlenewsNext
लिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांची लोकप्रियता ठरविता येऊ शकते. ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या २.४ कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फालोअर्स असणाºया भारतीयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम स्थानी असून त्यांचे २.६ कोटी फालोअर्स आहेत. त्यापाठोपाठ अमिताभ यांचा क्रमांक आहे. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना महानायक ही पदवी उगाच दिली गेली नाही. जगभरातील सर्वच वयोगटातील लोक अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. त्यांचा अभिनय अप्रतिम असून त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याचे दिसते. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह असून ते ट्विटर, फेसबुक व ब्लॉगच्या माध्यमातून आपले विचार वेळोवेळी मांडत असतात. आपली फालोअर्स संख्या २.४ कोटी झाली असल्याचे ट्विट स्वत: अमिताभ बच्चन यांनी केले. त्यांनी पिवळ्या रंगाचे स्वेटर परिधान केलेला फोटो पोस्ट करीत ही बातमी दिली. 
आपल्या ट्विटर पोस्टवर त्यांनी लिहले, ‘‘ट्विटरवर २.४ कोटी!बडुम्बा’’

T 2474 - 24 MILLION on Twitter !!! BAAADDDUUUUMMMMBAAAAAA !! pic.twitter.com/KslSNypzc6— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 16, 2016 ">http://

}}}}

ट्विटरवर सक्रिय असणाºया बॉलिवूड अभिनेत्यांत अमिताभ प्रथम स्थानी असून शाहरुख खान (२.२६ कोटी), सलमान खान (२.०७ कोटी), आमिर खान (१.९३ कोटी), दीपिका पादुकोण (१.६८), प्रियांका चोप्रा (१.५८ कोटी) यांचा क्रमांक लागतो. 

यावर्षी अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले असून या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘महिलांना नकाराचा अधिकार आहे’ हा या चित्रपटाचा गाभा असल्याने  सुंयुक्त राष्ट्र संघातही या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. पुढील वर्षी त्यांची मुख्य भूमिका असलेला राम गोपाल वर्मा यांचा ‘सरकार ३’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Amitabh Bachchan Shah Rukh Khan on Twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.