अभिषेक बच्चनला एकट्याला मिळणार नाही पित्याची संपत्ती, अमिताभ बच्चन यांनी केला संपत्ती वाटपाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:00 PM2019-08-25T12:00:57+5:302019-08-25T12:03:25+5:30
अमिताभ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे वाटप कसे होणार, हे अमिताभ यांनी सांगितले.
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 11’मुळे चर्चेत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’चे 11 वे सीझन सुरु झाले. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ समजासेविका सिंधुताई सपकाळ यांनी या सीझनच्या पहिल्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये सहभाग नोंदवला. सिंधुताईंनी ऐकलेल्या संघर्षाची कहाणी ऐकून अमिताभ भावूक झाले आणि याच क्रमात त्यांनी एक मोठा खुलासा केला. तो खुलासा होता अमिताभ यांच्या संपत्तीबद्दलचा. होय, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे वाटप कसे होणार, हे त्यांनी सांगितले.
T 3266 - .. in admiration respect and awe .. https://t.co/c40Crhrdoo
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2019
‘मी नसेल तेव्हा माझ्याकडे जे काही आहे, ते माझ्या दोन मुलांचे असेल. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. माझ्या मृत्यूपश्चात माझी संपत्ती या दोघांत समान प्रमाणात वाटली जाईल,’ असे अमिताभ यावेळी म्हणाले. एकंदर काय तर अमिताभ त्यांची संपत्ती केवळ अभिषेकला एकट्याला देणार नसून त्यात श्वेता बच्चन हिचाही समान वाटा असेल.
T 3258 - RakshaBandhan .. the love of the sister .. the protection of the brother .. the strong bond everlasting and sincere ..💞🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 14, 2019
रक्षाबंधन ! बहन का स्नेह ; भाई की सुरक्षा ; ये बंधन पवित्र , निरंतर , निश्चल pic.twitter.com/7vpZqrrdX1
सिंधुताईंना अनाथांची आई व महाराष्ट्राची मदर टेरेसा म्हटले जाते. सिंधुताईंनी आत्तापर्यंत 1200 मुलांना दत्तक घेतले असून त्यांना 36 सुना व 272 जावर्द आहेत. ज्याला आई नाही, त्याची मी आई आहे, असे सिंधुताई म्हणतात. त्यांच्या या योगदानासाठी सिंधुताईंना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. केवळ इतकेच नाही तर त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही बनवला गेला आहे. केबीसीच्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये सिंधुताईंनी 25 लाख रूपये जिंकले.