OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 03:21 PM2019-06-16T15:21:45+5:302019-06-16T15:22:30+5:30
काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट केले अन् ते ट्रोल झालेत.
काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गुजरातेतील या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २२ आणि २४ वर्षांची तरूण मुले होती. त्यामुळे अनेकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर सक्रिय असलेले आनंद महिन्द्रा हेही त्यापैकीच एक. आनंद महिन्द्रा यांनी गुजरातमधील या दुर्दैवी घटनेबद्दल ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला.
‘आता खूप झाले. लोकांच्या आयुष्याशी खेळणे पुरे झाले. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केले होते. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केले आहे. इतरांनीही वेग वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केले आहे. त्यांनी बनवलेले मशिन स्वीकारण्यात कुठली अशी अडचण येतेय. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की व्हावा,’ असे आनंद महिन्द्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिले.
Anand .. I had gifted 25 machines to BMC and a Truck to them .. the machines were given to individuals, the truck to BMC .. a Company in Aurangabad makes them .. never publicised it because that is not the reason for the gift .. its horrifying to learn of this day in and day out https://t.co/Vrh5nIOQjc
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 15, 2019
आनंद महिन्द्रांचे हे ट्वीट वाचल्यानंतर अमिताभ बच्चन यांना राहावले नाही. त्यांनीही एक ट्वीट केले. ‘आनंद, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेला २५ मशीन आणि एक ट्रक दिला आहे. मशीन वैयक्तिक लोकांना भेट देण्यात आली असून ट्रक बीएमसीला देण्यात आला आहे. औरंगाबादेत या उत्पादनांची निर्मिती होते. आतापर्यंत मी याबद्दल काही बोललो नव्हतो. कारण मी काय दिले हे सांगण्यासाठी ती भेट दिलेली नव्हती. जे घडले ते दु:खद आहे,’ असे ट्वीट त्यांनी केले. पण त्यांचे हे ट्वीट पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले.
...so why publicise it now?
— Aatreya (@AatreyaBhat) June 15, 2019
Sir delete the tweet please 🙏
Don't publicise please.
You are god 🙏🙏
You are fav actor of my son Panamu Singh.— Chowkidar Nirav Modi (@niiravmodi) June 15, 2019
He ain't publicising. If that would be his intentions then he would have publicised at the time of donation.— J.K. (@imjkzone) June 15, 2019
तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचेच नव्हते तर आता तरी का सांगितले,असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांना विचारला. अर्थात अनेकांनी बिग बी यांची बाजूही उचलून धरली. या घटनेशी निगडीत गोष्ट होती म्हणून अमिताभ यांनी त्या भेटीचा उल्लेख केला, असे म्हणत काही चाहत्यांनी बिग बींना ट्रोल करणाऱ्यांना फटकारले.