अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी दिला काम थांबवण्याचा सल्ला; पण...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 10:24 AM2019-11-08T10:24:30+5:302019-11-08T10:25:41+5:30
भारतीय चित्रपटसृष्टीचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला कालच म्हणजे 7 नोव्हेंबरला 50 वर्षे पूर्ण झालीत. पण नेमक्या याचदिवशी अमिताभ यांनी चाहत्यांशी अशी काही माहिती दिली की, सगळ्यांना धक्का बसला.
भारतीय चित्रपटसृष्टीचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला कालच म्हणजे 7 नोव्हेंबरला 50 वर्षे पूर्ण झालीत. 7 नोव्हेंबर 1969 रोजी बच्चन यांचा ‘सात हिंदुस्तानी’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता. अमिताभ यांच्या तमाम चाहत्यांसाठी कालचा हा दिवस आनंदाचा दिवस होता. यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण नेमक्या याचदिवशी अमिताभ यांनी चाहत्यांशी अशी काही माहिती दिली की, सगळ्यांना धक्का बसला. होय, डॉक्टरांनी अमिताभ यांना काही काळ काम न करण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात त्यांनी हा सल्ला धुडकावून लावत काम सुरु ठेवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
T 3540 - You can be treated and treated with care but treatment be treated in the treat of its care could never be treated in the treatment of care ..🐒
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2019
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये याबाबतचा खुलासा केला. ‘पृथ्वीवरच्या देवदुतांनी अर्थात डॉक्टरांनी मला सुट्टी घेऊन विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. पण मला लवकर कामावर परतायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी लिहिले,‘ वाढत्या वयासोबत प्रकृतीच्या समस्यांनी मला वेढले आहे. शरीराला याक्षणी अनेक सुरुंगातून जावे लागतेय. इंजेक्शनमधून औषध दिले जात आहे. पांढ-या शुभ्र कपड्यांतील पृथ्वीवरच्या देवदूतांनी आता थांबा, असा आदेश दिला आहे. पण मी उठून कामावर पतरणार. माझ्या चाहत्यांच्या प्रेमाखातर संपूर्ण ऊर्जेनिशी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी परतणार.’
T 3541 - .. the claustrophobic sound inside the 'tube' be of such magnitude that the elements that gave those indications of illness, themselves perish in the volume of thought that has prevailed ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 6, 2019
saying from recent experience ..
गत 15 ऑक्टोबरला अमिताभ यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 18 ऑक्टोबरला त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. याशिवाय त्यांचे चार चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो, ब्रह्मास्त्र या चित्रपटांत अमिताभ झळकणार आहेत.