होय, मी शूटींग केले तुम्हाला काही अडचण आहे का? अमिताभ बच्चन संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:22 PM2020-05-07T13:22:14+5:302020-05-07T13:22:38+5:30
केबीसी 12 च्या प्रोमोवरून नवा वाद
कोरोना व्हायरस शिवाय लॉकडाऊन असे सगळे असताना अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या 12 व्या सीझनची घोषणा केली, पाठोपाठ याचा प्रोमोही रिलीज आणि काही लोकांनी अमिताभ यांना सोशल मीडियावर ट्रोल करणे सुरू केले.
होय, कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. अशात बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती 12’साठी शूटींग केल्याचे बोलले जात आहे. नेमक्या याच कारणावरून त्यांना ट्रोल केले गेले. शिवाय देशात लॉकडाऊन असताना शूटींग केलेच कसे? असा सवाल अमिताभ यांना विचारला गेला़ आत. ट्रोलर्सच्या या प्रश्नाला अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमधून उत्तर दिले आहे.
ji .. its coming back to you again soon https://t.co/rCQn2kFsOK
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 2, 2020
‘हो, मी आत्ताच कामावरून परतलोय. तुम्हाला यामुळे त्रास होत असेल तर तो त्रास तुमच्यापर्यंतच मर्यादीत ठेवा. या शूटींगचा संबंध लॉकडाऊनशी जोडाल तर खबरदार.आम्ही योग्य ती काळजी घेऊन शूटींग केले. दोन दिवसांचे शूट एका दिवसांत पूर्ण केले. संध्याकाळी 6 वाजता सुरु केलेले काम काही वेळातच संपले,’ असे त्यांनी आपल्या या ब्लॉगमध्ये लिहिले.
T 3522 - Just back from work .. hamstring be damned .. social messaging videos .. acknowledging the 'angels' videos .. giving commendation to them that work so we exist .. and the invitations to the new season of KBC ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 5, 2020
The show goes on ..
heavy in heart , to all ..
‘कौन बनेगा करोडपती 12’ चे रजिस्ट्रेशन येत्या 9 मे रोजी रात्री 9 वाजतापासून सुरु होत आहे. यात अमिताभ बच्चन रोज रात्री 9 वाजता सोनी चॅनेलवर एक प्रश्न विचारतील. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एसएमएस किंवा सोनी लिव या अॅपवरुन द्यायचे आहे. प्रश्नाचे अचूक उत्तर देणा-यांना यातून निवडले जाईल आणि त्यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्यात येईल. प्रोसेसच्या तिस-या टप्प्यात निवडलेल्या स्पर्धकांची एक सामान्य ज्ञानाची परिक्षा घेतली जाईल. याचा व्हिडीओ बनवून स्पर्धकांना तो सोनी लिव अॅपवरुन पाठवायचा आहे. त्यानंतर या स्पर्धकांची व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलाखत घेतली जाईल.
रजिस्ट्रेशन प्रक्रियेसह शो सुरु होण्यास 3 महिन्यांचा काळ लागतो. तोपर्यंत स्थिती सामान्य होईल, अशी आशा चॅनलला आहे. केबीसीचे आॅडिशन चार भागांत होते. पहिल्या भागात रजिस्ट्रेशन, मग स्क्रिनिंग, ऑनलाईन ऑडिशन व पर्सनल इंटरव्ह्यू असे हे चार टप्पे असतात.