ना आलिया ना दीपिका, बिग बींनी केलं 'या' अभिनेत्रीचं कौतुक, शेअर केला सिनेमाचा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:39 AM2023-10-31T10:39:30+5:302023-10-31T10:40:02+5:30

नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एका सिनेमाचा ट्रेलर शेअर करत मुख्य अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

amitabh bachchan shows his admiration for actress shefali shah shared her movie trailer | ना आलिया ना दीपिका, बिग बींनी केलं 'या' अभिनेत्रीचं कौतुक, शेअर केला सिनेमाचा ट्रेलर

ना आलिया ना दीपिका, बिग बींनी केलं 'या' अभिनेत्रीचं कौतुक, शेअर केला सिनेमाचा ट्रेलर

भारतीय सिनेसृष्टीत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना महानायक असंही संबोधलं जातं. तब्बल ५ दशकांपासून ते सिनेसृष्टीत काम करत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांनी कामात ब्रेक घेतलेला नाही. त्यामुळे अशा या महानायकाने कोणाचं कौतुक करावं हे त्या व्यक्तीसाठी एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नसतं. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एका सिनेमाचा ट्रेलर शेअर करत मुख्य अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

'थ्री ऑफ अस' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीर अहलावत यांची मुख्य भूमिका आहे. यामध्ये शेफाली शाहला डिमेन्शिया या आजाराचं निदान होतं. म्हणजेच हळहळू तिची स्मरणशक्ती जाणार असते. हे कळताच ती जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी तिचं मूळ गाव वेंगुर्ला येथे पतीसह जाते. तिथे तिला तिचा लहानपणीचा प्रियकर भेटतो. अतिशय सुंदर अशी ही कथा दाखवण्यात आली आहे. त्यात शेफालीचा अभिनय नेहमीच प्रभावी असतो. अमिताभ बच्चन यांनी शेफालीच्या अभिनयाची स्तुती करत सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. तसंच चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी लिहितात,'सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. शेफालीचं विशेष कौतुक...उत्कृष्ट अभिनेत्री आणि परफॉर्मर.'

अमिताभ बच्चन यांनी कौतुकाची थाप दिली म्हणल्यावर नक्कीच ती शेफालीसाठी खास प्रतिक्रिया आहे. 'थ्री ऑफ अस' हा सिनेमा ३ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. अभिनय, सिनेमॅटोग्राफीचं उत्कृष्ट दर्शन या सिनेमातून घडणार आहे.

Web Title: amitabh bachchan shows his admiration for actress shefali shah shared her movie trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.