Amitabh Bachchan Sooryavansham: 'सूर्यवंशम'मधील अमिताभचा गोंडस नातू आता दिसतो हँडसम; 20 तेलुगू चित्रपटांमध्ये केलंय काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:41 PM2022-12-29T17:41:58+5:302022-12-29T17:42:28+5:30

Amitabh Bachchan Sooryavansham: अमिताभ बच्चन स्टारर 'सूर्यवंशम' चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Amitabh Bachchan Sooryavansham: Amitabh's cute grandson from 'Sooryavansham' now looks handsome; Worked in 20 Telugu films | Amitabh Bachchan Sooryavansham: 'सूर्यवंशम'मधील अमिताभचा गोंडस नातू आता दिसतो हँडसम; 20 तेलुगू चित्रपटांमध्ये केलंय काम...

Amitabh Bachchan Sooryavansham: 'सूर्यवंशम'मधील अमिताभचा गोंडस नातू आता दिसतो हँडसम; 20 तेलुगू चित्रपटांमध्ये केलंय काम...

googlenewsNext

Amitabh Bachchan Sooryavansham: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्टारर सूर्यवंशम (Film Sooryavansham) 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा आयकॉनिक चित्रपट आजही लोकांना खूप आवडतो. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी अतिशय चांगला अभिनय केला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन दुहेरी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अमिताभ यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकारानेही सर्वांचे लक्ष वेधले होते. हा बाल कलाकार आता मोठा झाला असून, त्याने अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

आता दिसतो हँडसम
सूर्यवंशम चित्रपटात निरागस दिसणारा हा मुलगा मोठा होऊन मोठ्या स्टारपेक्षा कमी दिसत नाही. आनंद वर्धन (Anand Vardhan) असे या बाल कलाकाराचे नाव असून, आनंद आता मोठा आणि हँडसम झाला आहे. आनंदचे पूर्ण नाव पीबीएस आनंद वर्धन आहे. आनंद हा तेलुगू अभिनेता असून त्याने 20 हून अधिक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आजोबा प्रसिद्ध गायक
प्रियाराग्लू या चित्रपटातून आनंदने बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. यानंतर तो सूर्यवंशम चित्रपटात दिसला. रिपोर्ट्सनुसार, आनंदचे आजोबा पी.बी. श्रीनिवास हे गायक होते. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक गाणी गायली. आपल्या कुटुंबातील कोणीतरी अभिनेता व्हावे अशी श्रीनिवासची इच्छा होती आणि त्यांनी आपल्या नातवाला अभिनेता बनवले.

अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर
एका मुलाखतीत आनंदने सांगितले की, तो जवळपास 12 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तो त्याचा अभ्यास पूर्ण करत होता. आनंदने सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून (CMR College of Engineering & Technology) संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बीटेक केले आहे. यापुढे तो चित्रपटांमध्ये दिसू शकतो.

Web Title: Amitabh Bachchan Sooryavansham: Amitabh's cute grandson from 'Sooryavansham' now looks handsome; Worked in 20 Telugu films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.