अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘झुंड’चे शूटींग, सोशल मीडियावर दिली माहिती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:30 PM2018-12-04T13:30:02+5:302018-12-04T13:30:51+5:30

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत.

amitabh bachchan start shooting for his upcoming film jhund | अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘झुंड’चे शूटींग, सोशल मीडियावर दिली माहिती!!

अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘झुंड’चे शूटींग, सोशल मीडियावर दिली माहिती!!

googlenewsNext
ठळक मुद्देकाल अमिताभ नागपुरात आल्याचे कळताच, नागपूरकर ‘सैराट’ झालेत. यानंतर चाहत्यांनी लगेच ‘झुंड’चे शूटींग सुरू असलेल्या मोहननगर भागाकडे चाहत्यांनी धाव घेतली.

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत. काल सोमवारी अमिताभ नागपूर विमातळावर उतरले. खुद्द अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. नागपूर विमानतळावरचे दोन फोटो शेअर करत आपण नागपुरात असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘NAGPUR .. for 'Jhund' .. the new project by Nagraj , his first in Hindi, the maker of 'Sairat' the Marathi block buster .. a centre of attraction .. and NAGPUR, geographically apparently the centre of geographic India .. may the 2 centres thrive ,’ असे अमिताभ यांनी लिहिले आहे.




काल अमिताभ नागपुरात आल्याचे कळताच, नागपूरकर ‘सैराट’ झालेत. यानंतर चाहत्यांनी लगेच ‘झुंड’चे शूटींग सुरू असलेल्या मोहननगर भागाकडे चाहत्यांनी धाव घेतली. याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मागच्या आवारात ‘झुंड’चा सेट लागला आहे. काल दिवसभर चाहत्यांनी या सेटवर गर्दी केली. अर्थात सेटपासून अनेक किलोमीटर अंतरावर चाहत्यांना रोखून धरण्यात आले. मीडियाला सुद्धा सेटवर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी  नागराज यांच्या या चित्रपटातून माघार घेतल्याची खबर आली होती. प्रारंभी या चित्रपटासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला होता. यामुळे चित्रपटाचे अख्खे वेळापत्रक विस्कटले होते आणि याचा परिणाम म्हणजे, अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रकही वेळापत्रक बिघडले होते.  यामुळे वैतागून अमिताभ यांनी या चित्रपटातून माघार घेतल्याचे म्हटले गेले होते.  
 अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

Web Title: amitabh bachchan start shooting for his upcoming film jhund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.