'खाइके पान बना रसवाला', अमिताभ बच्चन यांनी आवडते पान खाणे का सोडले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 02:05 PM2022-11-03T14:05:14+5:302022-11-03T14:17:10+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शो चा चाहतावर्ग कोण नाही. अनेकदा ते शो मध्ये आलेल्या कंटेस्टंटची टर खेचताना दिसतात.

amitabh bachchan stopped eating paan | 'खाइके पान बना रसवाला', अमिताभ बच्चन यांनी आवडते पान खाणे का सोडले ?

'खाइके पान बना रसवाला', अमिताभ बच्चन यांनी आवडते पान खाणे का सोडले ?

googlenewsNext

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शो चा चाहतावर्ग कोण नाही. अनेकदा ते शो मध्ये आलेल्या कंटेस्टंटची टर खेचताना दिसतात. तर काही वेळेस कंटेस्टंटसमोर ते आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गुपितं शेअर करत असतात. शो मध्ये सामील झालेले प्रेक्षक यासर्व संभाषणाची चांगलीच मजा घेताना दिसतात. आत्तापर्यंत झालेल्या एपिसोडमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नुकतेच बिग बींनी आणखी एक गुपित एपिसोडमध्ये उघड केले आहे. त्यांनी सांगितले की पत्नी जया यांना मासे खायला खूप आवडतात मी मात्र मासे खाणं पूर्ण सोडले आहे.' 

कौन बनेगा करोडपतीच्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये विद्या रेडकर या हॉटसीटवर सहभागी होत्या. विद्या यांनी बिग बींना विचारले की जयाजींना मासे खायला खूपच आवडत असतील ना. त्यावर बिग बी म्हणाले, जयाजींना तर मासे खूपच प्रिय आहेत. मी मात्र मांसाहारी पदार्थ खाणे आता सोडले आहे. तरुण वयात बरेच काही खाता यायचे. आता अनेक गोष्टी खाता येत नाही. गोड पदार्थ, भात एवढेच काय तर पान खाणं पण सोडून दिले आहे.' हे ऐकून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

बिग बी ८० वर्षांचे असून अजुनही तरुणांनाही लाजवेल असा त्यांच्या कामाचा वेग आहे. विशेष म्हणजे या वयातही अत्यंत फीट आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन यांचे ब्रम्हास्त्र आणि गुडबाय हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. तर आता ११ नोव्हेंबर रोजी त्यांचा ऊॅंचाई हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचीही सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये बिग बी यांच्यासह अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा यांची महत्वाची भुमिका आहे.

Web Title: amitabh bachchan stopped eating paan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.