अमिताभ बच्चन खरंच रिटायरमेंट घेत आहेत? बिग बींनी उलगडला 'त्या' पोस्टमागील अर्थ; म्हणाले-

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:17 IST2025-02-28T10:14:23+5:302025-02-28T10:17:51+5:30

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पोस्ट केल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमिताभ यांनी अखेर त्या पोस्टविषयी मौन सोडले

amitabh bachchan talk about meaning of time to go twiiter post | अमिताभ बच्चन खरंच रिटायरमेंट घेत आहेत? बिग बींनी उलगडला 'त्या' पोस्टमागील अर्थ; म्हणाले-

अमिताभ बच्चन खरंच रिटायरमेंट घेत आहेत? बिग बींनी उलगडला 'त्या' पोस्टमागील अर्थ; म्हणाले-

अमिताभ बच्चन  (amitabh bachchan) हे बॉलिवूडमधील 'शहनशाह' म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांच्या प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात कायम आहेत. अमिताभ यांच्या वयाची ८० वर्ष ओलांडली असली तरीही ते आज सळसळत्या एनर्जीत मनोरंजन विश्वात काम करत आहेत. अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केल्याने त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटली. ती पोस्ट होती Time To Go..., ही पोस्ट वाचून अमिताभ कलाविश्वातून रिटायरमेंट घेणार का? याविषयी चर्चा सुरु झाल्या. अखेर बिग बींनीच या पोस्टमागचा अर्थ स्पष्ट केलाय.

का केली अमिताभ यांनी ती पोस्ट?
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच KBC 16 च्या मंचावर त्यांनी मागे केलेल्या 'टाईम टू गो' या पोस्टवर खुलासा केला. अमिताभ यांना KBC 16 च्या मंचावर प्रेक्षकांनी या प्रश्नाबाबत छेडले असता बिग बींनी मजेशीर उत्तर देऊन त्यांच्या रिटायरमेंट चर्चांवर पूर्णविराम ठेवला. अमिताभ म्हणाले की, "टाइम टू गो.. अर्थात जाण्याची वेळ झाली आहे याचा अर्थ मला कामाला जायचं होतं. रात्री २ वाजता जेव्हा शूटिंगमधून सुट्टी मिळते तेव्हा घरी पोहचायला उशीर होतो. त्यामुळे ती पोस्ट लिहिता लिहिता मला झोप आली. त्यामुळे टाईम टू गो.. एवढंच लिखाण झालं आणि मी झोपलो."

बिग बी रिटायरमेंट नाही घेणार
अमिताभ बच्चन यांच्या या उत्तराने एकच हशा पिकला. अशाप्रकारे बिग बी तूर्तास तरी मनोरंजन क्षेत्रातून निवृत्त होणार नाहीत, हे सर्वांनाच स्पष्ट झालंय. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते सध्या KBC 16चं सूत्रसंचालन करत आहेत. याशिवाय २०२४ मध्ये अमिताभ यांचा 'कल्की २८९८ एडी' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील बिग बींनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका चांगलीच गाजली. अमिताभ यांच्या आगामी सिनेमाबद्दल तूर्तास कोणतीही अपडेट समोर नाही.

Web Title: amitabh bachchan talk about meaning of time to go twiiter post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.