'तुमचंं अकाऊंट हॅक झालंय वाटतं!', अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:08 PM2024-07-16T15:08:03+5:302024-07-16T15:09:14+5:30

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन एका कारणाने सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. असं काय घडलं?

amitabh bachchan troll for promoting music viideo of kamal r khan krk | 'तुमचंं अकाऊंट हॅक झालंय वाटतं!', अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर! नेमकं काय घडलं?

'तुमचंं अकाऊंट हॅक झालंय वाटतं!', अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर! नेमकं काय घडलं?

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. अमिताभ यांनी आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.अमिताभ यांची भूमिका असलेला 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. सिनेमात अमिताभ यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका चांगलीच गाजतेय. पण अशातच अचानक बिग बी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. बिग बी यांनी एक पोस्ट केल्याने त्यांना चांगलंच ट्रोल व्हावं लागलंय.

अमिताभ यांची एक पोस्ट अन् झाले ट्रोल

अमिताभ यांनी एक पोस्ट केलीय ज्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलंय. अमिताभ यांनी अभिनेता-समीक्षक कमाल आर खानच्या एका म्यूझिक व्हिडीओचा पोस्टर शेअर केलाय. त्यामुळे अमिताभ ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. KRK कायमच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि फिल्म रिव्ह्यूच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचा म्यूझिक व्हिडीओ अमिताभ यांनी शेअर केल्याने बिग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.

 

अमिताभ यांच्या पोस्टखाली कमेंट्सचा पाऊस

'सर तुमचं अकाऊंट कोणी हॅक केलं. लवकरात लवकर पासवर्ड चेंज करा', 'सर हा SRK  नाही तर KRK आहे', 'सर परंपरा-प्रतिष्ठा-अनुशासनच्या विरुद्ध गोष्ट आहे ही', 'सर या डबल ढोलकी माणसाचं प्रमोशन करण्याची काय आवश्यकता आहे', 'असं वाटलं नव्हतं की हा दिवस पण बघावा लागेल', अशा कमेंट करत अमिताभ यांच्यावर ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. अमिताभ यांच्या 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

Web Title: amitabh bachchan troll for promoting music viideo of kamal r khan krk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.