लोकसभा निवडणूक अन् अमिताभ बच्चन यांचा जोक..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:58 PM2019-04-16T13:58:06+5:302019-04-16T14:41:20+5:30
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. बॉलिवूडलाही निवडणूक ज्वर चढलाय. कुणी राजकीय मुद्यांवर हिरहिरीने बोलताना दिसताहेत तर कुणी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय मुद्यांवर भाष्य करताहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही यात मागे नाहीत.
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. बॉलिवूडलाही निवडणूक ज्वर चढलाय. कुणी राजकीय मुद्यांवर हिरहिरीने बोलताना दिसताहेत तर कुणी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय मुद्यांवर भाष्य करताहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही यात मागे नाहीत. अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे काही ट्वीट केले की, ते वाचून तुम्ही हसू रोखू शकणार नाही. होय, अमिताभ यांनी निवडणूक काळात एका व्यक्तिच्या सुरक्षेवरून चिंतीत झाले आणि त्यांची ही चिंता लोकांच्या हसण्याचे कारण बनली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक जोक पोस्ट केला. यात त्यांनी नेत्यांच्या झेड प्लस सुरक्षेची टर उडवली. हा जोक तुम्ही खाली वाचू शकता.अमिताभ यांनी शेअर केलेला हा जोक चाहत्यांना चांगलाच भावला. अनेक लोकांनी तो शेअर केला.
T 3135 -" एक बन्दा इलेक्शन मे किस्मत आजमा रहा था, उसे सिर्फ तीन वोट मिले,उसने सरकार से Z+ सुरक्षा की मांग की
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 16, 2019
जिले के DM ने कहा “आप को सिर्फ 3 वोट मिले है आप को Z+ कैसे दे सकते है
आदमी बोला:-जिस शहर मे इतने लोग मेरे खिलाफ हो तो मुझे सुरक्षा मिलनी ही चाहिए।"
~ Ef AM
🤣🤣🤣
तुम्हाला ठाऊक आहेच की, एकेकाळी अमिताभ हेही राजकारणाच्या आखाड्यात उतरले होते. १९८४ मध्ये चित्रपटांमधून ब्रेक घेत, अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश केला होता. अमिताभ राजीव गांधी यांचे जवळचे मित्र होते. आपल्या मित्राची मदत करण्यासाठी अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. ८ व्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद सीटवरुन काँग्रेसच्या तिकिटावर अमिताभ निवडणुकीसाठी उभे झालेत आणि जिंकलेही. पण हे राजकारण फार काळ त्यांना मानवले नाही. तीनच वर्षांत अमिताभ यांनी राजकारणातून बाहेर पडलेत. बोफोर्स दलाली वादात अमिताभ आणि त्यांचा भाऊ अजिताभवर आरोप लावण्यात आले. यानंतर त्यांनी क्राँग्रेस आणि राजकारणाला रामराम ठोकला.