'बागबान'साठी अमिताभ बच्चन नव्हते पहिली पसंती, रिलीजच्या ३० वर्षांपूर्वीच झाली होती या सुपरस्टारची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:12 PM2024-03-01T12:12:11+5:302024-03-01T12:13:25+5:30
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा 'बागबान' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती, मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना कशी सोडून जातात आणि त्यांना सोबत ठेवल्यावर त्यांना कसे वेगळे करतात.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांचा 'बागबान' (Baghbaan Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती, मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना कशी सोडून जातात आणि त्यांना सोबत ठेवल्यावर त्यांना कसे वेगळे करतात. या चित्रपटात सलमान खाननेअमिताभ बच्चन यांच्या आदर्श मुलाची भूमिका साकारली होती, ज्याला त्यांनी दत्तक घेतले होते. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन पहिली पसंती नव्हती. या चित्रपटाची संकल्पना बीआर चोप्रा यांनी प्रदर्शित होण्याच्या ३० वर्षांपूर्वी दिली होती.
IMDb च्या रिपोर्टनुसार, ही संकल्पना बीआर चोप्रा यांच्या मनात बागबान रिलीज होण्याच्या ३० वर्षांपूर्वी आली होती. जेव्हा ते डेन्मार्कला गेले होते तेव्हा ते तिथल्या रिटायरमेंट होममधून बाहेर पडत होते. जिथे ते एका महिलेला भेटले. महिलेने सांगितले की तिची मुले तिला इथे सोडून गेली होती आणि तिला भेटायलाही आले नव्हते. त्यावेळी राज मल्होत्राच्या भूमिकेसाठी बीआर चोप्रा यांची पहिली पसंती दिलीप कुमार होते. पण हा चित्रपट तेव्हा बनू शकला नाही आणि ३० वर्षांनी बनला. दिलीप कुमार यांनी बीआर चोप्राच्या चित्रपटात काम न केल्याची खंतही व्यक्त केली होती.
१० कोटींमध्ये बनलेल्या 'बागबान'ने केली होती दमदार कमाई
या चित्रपटात सलमान खानने अमिताभ बच्चन यांच्या दत्तक मुलाची भूमिका साकारली होती. सिनेमात दत्तक घेतलेल्या मुलाचे शिक्षण आणि संगोपन अमिताभ बच्चन यांनीच केले. हे पात्र शाहरुख खानला डोळ्यासमोर ठेवून लिहिले होते पण नंतर ते सलमान खानने केले. बागबानबद्दल सांगायचे तर, याचे दिग्दर्शन रवी चोप्रा यांनी केले होते आणि बीआर चोप्रा यांनी निर्मिती केली होती. १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच हेमा मालिनी, अमन वर्मा, समीर सोनी, महिमा चौधरी, सलमान खान आणि रिमी सेन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.