अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:08 IST2022-01-20T12:07:22+5:302022-01-20T12:08:08+5:30
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा करतेय बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा नवेली नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मने जिंकत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर दोन ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण फोटोंपेक्षाही यावर एका फॅनने केलेली कमेंट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती 'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
नव्या नवेली नंदाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे, त्यात ती सोफ्यावर बसलेली दिसते आहे. दीपिका पादुकोणसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे. दीपिका पादुकोणने लिहिले, 'सुंदर.' एका चाहत्याने लिहिले, 'विलक्षण सौंदर्य', तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'सुंदर हसणारी मुलगी... मिस नव्या.' आणखी एका यूजरने लिहिले, 'आजोबांवर गेली आहे... एक दिवस स्वत:ची ओळख बनवेल...'
दरम्यान, एका यूजरने अंदाज वर्तवला आणि लिहिले, 'मला वाटते की नव्या आणि सिद्धांत चतुर्वेदी दोघेही पोस्ट केल्याप्रमाणे डेटिंग करत आहेत, असे दिसते आहे. जवळपास एकच दिवस त्यांचे ओरिगामी फोटो आणि व्हिडीओ आणि जेव्हापासून सिद्धांत आणि दीपिका एकत्र चित्रपट करत आहेत, तिने फोटोवर कमेंट देखील केली आहे. नव्या बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधीच चर्चेत येत असते. तिचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.