अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला लिहिलेलं पत्र व्हायरल, काय म्हणाले होते बिग बी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:31 PM2024-11-12T18:31:50+5:302024-11-12T18:31:58+5:30

अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Amitabh Bachchan's Letter To Nimrat Kaur Goes Viral | Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला लिहिलेलं पत्र व्हायरल, काय म्हणाले होते बिग बी ?

अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला लिहिलेलं पत्र व्हायरल, काय म्हणाले होते बिग बी ?

Amitabh Bachchan's Letter To Nimrat Kaur : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) यांनी 'दसवी' सिनेमात एकत्र काम केलं होतं.  या सिनेमादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि हेच अभिषेक-ऐश्वर्यामधील दुराव्याचं कारण ठरलं, अशी चर्चा सुरू आहे. यातच आता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी निमरतला लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हे पत्र दोन वर्ष जूनं आहे. 

निमरतचा दसवी सिनेमातील अभिनय पाहून अमिताभ बच्चन यांनी तिला हस्तलिखित पत्र आणि फुलांचा गुच्छ पाठवला होता. पत्र आणि फुलांचा गुच्छाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. या पत्रात बिग बींनी लिहिलं, "आपलं फार क्वचित बोलणं किंवा भेट झाली असेल. कॅडबरीच्या जाहिरातीसाठी मी तुझं YRF च्या कार्यक्रमात कौतुक केलं होतं. तोच आपला शेवटचा संवाद होता. पण दसवी या चित्रपटातील तुझं काम विलक्षण आहे. तुझ्या अभिनयातील बारकावे, हावभाव सर्वकाही उत्तम आहे. यासाठी मी तुझी प्रशंसा करतो आणि तुला शुभेच्छा देतो".

निमरत हिने अमिताभ यांचं हे पत्र शेअर करत लिहलं होतं की, "18 वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. तेव्हा हा विचार मनातही आला नव्हता की अमिताभ बच्चन हे माझ्या नावानं मला ओळखतील...आमच्या भेटीला आठवतील... टिव्हीवर येणाऱ्या जाहिरातीतील माझ्या अभिनयाचं कौतुक करतील... तर अनेक वर्षानंतर एका चित्रपटातील माझा प्रयत्न पाहून मला एक पत्र आणि फूलं पाठवतील". 


पुढे तिने लिहलं होतं,  "खूप प्रेम आणि आभार... आज शब्द आणि भावना दोन्ही कमी पडत आहेत. तुमचे हे प्रेमळ पत्र मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. या अनमोल पुष्पगुच्छाच्या रूपात तुमच्या आशिर्वादाचा सुगंध माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दरवळत राहील.  तुम्ही दिलेल्या या शाबासकीनं एक शांतता जाणवत आहे... जशी एका भलामोठा पर्वत किंवा प्राचीन मंदिराच्या समोर जाणवते. मी कायम आभारी राहिन".
 

Web Title: Amitabh Bachchan's Letter To Nimrat Kaur Goes Viral | Abhishek Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.