​‘अमिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2016 04:19 PM2016-09-17T16:19:50+5:302016-09-17T21:49:50+5:30

‘अमिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस आहे,’ असे वक्तव्य करून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नवा वाद ओढवून ...

'Amitabh is an empty head' | ​‘अमिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस’

​‘अमिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस’

googlenewsNext
मिताभ हा रिकाम्या डोक्याचा माणूस आहे,’ असे वक्तव्य करून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. काल शुक्रवारी अमिताभ यांचा ‘पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यापार्श्वभूमीवर काटजू यांनी अमिताभ यांना लक्ष्य केले. केवळ अमिताभच नाही तर काटजू यांनी पत्रकारांनाही यात गोवले. अनेक पत्रकार अमिताभ यांची प्रशंसा करतात. हे पाहून या पत्रकारांची डोकीही अमिताभप्रमाणे रिकामी आहेत की काय, अशी शंका मला येते, असे काटजू म्हणाले. आपले हे विधान पटवून देण्यासाठी काटजू कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेताना दिसले. ‘कार्ल मार्क्स  म्हणायचा की,धर्म हा अफू सारखा असतो. लोकांनी बंड करू नये यासाठी त्यांना गुंगीत ठेवण्याकरता सत्ताधा-यांकडून धर्म नावाच्या अफूचा वापर केला जातो. पण भारतीयांना शांत ठेवण्यासाठी अशा विविध प्रकारच्या ड्रग्जचा वापर केला जातो.  धर्माबरोबर माध्यमे, चित्रपट, क्रिकेट, बाबा, भविष्य हे फंडे वापरून भारतीय जनतेला मुठीत ठेवता येते. यातला सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे चित्रपट. एका रोमन राज्यकर्त्याच्या मते, जर तुम्ही लोकांना पोटापाण्याचे साधन उपलब्ध करून देऊ शकत नाही तर त्यांच्या मनोरंजनाची सोय करुन त्यांना गुंतून ठेवा. अमिताभ बच्चन, देवानंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना यांचे चित्रपटही असेच आहेत हे चित्रपट म्हणजे लोकांना शांत ठेवण्याचे नेत्यांच्या हातातील चांगले शस्त्र आहे,’ असे काटजू म्हणाले. अमिताभ यांनी समाजासाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला.

Web Title: 'Amitabh is an empty head'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.