अमिताभ यांना ३ कोटींचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2016 03:23 AM2016-03-24T03:23:59+5:302016-03-23T20:23:59+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांच्या टिष्ट्वटर फॉलोअर्सची संख्या २ कोटींवर पोहोचली आहे.  दोन कोटी फॉलोअर्स असलेले बिग बी बॉलिवूडमधील पहिले ...

Amitabh picks up Rs 3 crore | अमिताभ यांना ३ कोटींचे वेध

अमिताभ यांना ३ कोटींचे वेध

googlenewsNext
ानायक अमिताभ बच्चन यांच्या टिष्ट्वटर फॉलोअर्सची संख्या २ कोटींवर पोहोचली आहे.  दोन कोटी फॉलोअर्स असलेले बिग बी बॉलिवूडमधील पहिले सेलिब्रिटी बनले आहेत. विशेष म्हणजे यानंतर अमिताभ यांना ३ कोटींचा पल्ला गाठायचा आहे. मंगळवारी रात्री बिग बींनी याबाबत आपल्या चाहत्यांना धन्यवाद दिले. ‘बडुम्बा, दोन कोटी...तुम्हा सर्वांचे धन्यवाद... आता ३ कोटींची प्रतीक्षा...’ असे टिष्ट्वट अमिताभ यांनी केले. अमिताभ यांनी मे २०१० मध्ये टिष्ट्वटर खाते उघडले होते. यानंतर ते कायम टिष्ट्वटरवर सक्रिय आहेत. टिष्ट्वटर फॉलोअर्सला ते स्वत:ची ‘ईएफ’ म्हणजे ‘एक्सटेंडेड फॅमिली’ म्हणतात. टिष्ट्वटरवर फॉलोअर्सबाबतीत अमिताभ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे सोडले आहे. मोदींचे सध्या १.८८ कोटी फॉलोअर्स आहेत.
 

T 2183 - Baduuummmbaaaaa !! 20 MILLION !!! thank you all .. now to 30 million !! and your time starts NOW !!

Web Title: Amitabh picks up Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.