अमिताभ, सलमान, आमिरला आॅस्करचे आमंत्रण, शाहरुख खानचा विसर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 10:30 AM2017-06-29T10:30:28+5:302017-06-29T16:00:28+5:30
भारतातील तमाम सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, आमिर खान, ...
भ रतातील तमाम सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, आमिर खान, इरफान खान, दीपिका पादुकोण यांच्यासह काही चित्रपट निर्माते आॅस्करवारीला जाणार आहेत. आॅस्कर सोहळ्याचे आयोजन करणाºया अकादमी आॅफ मोशन आर्ट्स अॅण्ड सायन्सकडून या बॉलिवूड सेलिब्रिटींना सदस्य बनण्यासाठीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीतून शाहरूख खानचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. खरे तर शाहरुख भारतापेक्षा विदेशात अधिक लोकप्रीय आहे. त्याने मिळवलेले अफाट यश पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, आॅस्करने मात्र बॉलिवूडच्या या किंगकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते आहे.
या कलाकारांसोबतच निर्माते गौतम घोष, बुद्धसाहेब दासगुप्ता यांच्यासह जवळपास ७७४ व्यक्तींना अकॅडमीमध्ये जाऊन आॅस्करसाठी त्यांचे मत देण्याचे आमंत्रण दिले गेले आहे.
अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स वेबसाइने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी ५७ देशांमधील व्यक्तींना बोलवण्यात आले आहे. यात बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, इरफान खान, वेशभूषाकार अर्जुन भसिन यांच्या नावाचा समावेश आहे.
अकॅडमीतर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या व्यक्तींच्या या नव्या प्रवर्गात ३९ टक्के महिला आणि ३० टक्के नॉन व्हाईट वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. आॅस्कर पुरस्कार सोहळ्यावर वर्णभेदावरून बरीच टीका केली जाते. ती पाहत गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे आमंत्रितांची विभागणी करण्यात येत आहे.