बॉलिवूडच्या गब्बर सिंगला होती या गोष्टी सवय, सेटवर घेऊन आले होते २ म्हशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 11:07 AM2018-07-27T11:07:56+5:302018-07-27T11:10:37+5:30

गब्बर सिंगची भूमिका प्रभाव करून गेली आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान हे तर या भूमिकेमुळे अजरामर झाले आहेत. आज त्यांचा स्मृतीदिन. चला जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी...

Amjad Khan Death Anniversary : Unknown fact Bollywood's Gabbar Singh | बॉलिवूडच्या गब्बर सिंगला होती या गोष्टी सवय, सेटवर घेऊन आले होते २ म्हशी!

बॉलिवूडच्या गब्बर सिंगला होती या गोष्टी सवय, सेटवर घेऊन आले होते २ म्हशी!

googlenewsNext

मुंबई : आजही बॉलिवूड सिनेमांचा उल्लेख केला गेला तर शोले या सिनेमाचा उल्लेख होतोच. आणि शोलेचा उल्लेख झाला तर गब्बर सिंगच्या उल्लेख होणार नाही असे होऊ शकत नाही. या सिनेमातील 'सो जा बेटा नहीं तो गब्‍बर आ जाएगा' हा डायलॉग आजही तितकाच लोकप्रिय आहे जितका त्यावेळी झाला होता. इतकी गब्बर सिंगची भूमिका प्रभाव करून गेली आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान हे तर या भूमिकेमुळे अजरामर झाले आहेत. आज त्यांचा स्मृतीदिन. चला जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी...

अमजद खान हे पडद्यावर जितके कठोर दिसायचे त्याउलट खऱ्या आयुष्यात ते फार विनम्र होते. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० मध्ये झाला होता. केवळ ४८ वय असताना २७ जुलै १९९२ मध्ये ते आपल्याला सोडून गेले. ८० च्या दशकात व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. 

त्यांचे वडिलही साकारायचे व्हिलन

अभिनयाचं बाळकडू अमजद खान यांना घरातूनच मिळालं होतं. त्यांचे वडील जयंत हे सिने इंडस्ट्रीत व्हिलन म्हणून काम करायचे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 'अब दिल्ली दूर नही' या सिनेमातून केली होती. या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. पण १९७५ साली आलेल्या 'शोले' सिनेमाने त्यांना रातोरात स्टार केले. 

तर गब्बर सिंगचा रोल त्याना मिळाला नसता

महत्वाची बाब म्हणजे अमजद खान हे गब्बरच्या भूमिकेसाठी पहिली पसंत नव्हते. असे सांगितले जाते की, गब्बरच्या भूमिकेसाठी आधी डॅनी यांना विचारण्यात आलं होतं. पण काही कारणास्तत त्यांनी ही भूमिका केली नाही. आणि हा रोल अमजद खान यांच्या पदरात पडला.
शोलेच्या मेकर्सना अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी योग्य वाटला नव्हता. त्यामुळे त्यांना डॅनी यांना या सिनेमात घ्यायचं होतं. पण शेवटी अमजद खान यांनीच ही अजरामर भूमिका साकारली.

या गोष्टीची होती सवय

अमजद खान हे फारच साधं जीवन जगायचे. पण त्यांना एका गोष्टीची फारच सवय होती. त्या गोष्टीशिवाय ते राहूच शकत नव्हते. ती म्हणजे चहा. अमजद खान हे चहा शिवाय राहूच शकत नव्हते. असे सांगितले जाते की, एका दिवसात ते ३० कप चहा प्यायचे. चहा त्यांनी कमजोरी होती, त्यांना चहा मिळाला नाही तर ते कामही करू शकत नव्हते. 

..अन दोन म्हशी घेऊन आले

मीडिया रिपोर्टनुसार, एकदा अमजद खान हे रिहर्सलसाठी पृथ्वी थिएटरमध्ये आले होते. काम सुरु करण्याआधी त्यांनी चहा मागितला होता पण दूध नसल्या कारणाने त्यांना चहा मिळाला नाही. पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत चहा हवा होता. त्यांना चहा न मिळाल्याने ते हैराण झाले होते. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा रिहर्सलसाठी आले तेव्हा सोबत दोन म्हशी घेऊन आले होते. यावरुन त्यांना चहाची किती सवय होती हे कळतं.

या अभिनेत्रीसोबत अफेअर

बॉलिवूडमध्ये त्यावेळी अशी चर्चा होती की, अमजद खान हे अभिनेत्री कल्पना अय्यरवर प्रेम करत होते. पण अमजद खान यांचं आधीच लग्न झालेलं होतं. त्यांना तीन मुलं होती. त्यामुळे त्यांनी कधीही ही बाब जाहीर केली नाही. पण दोघांमध्ये एक समानता होती ती म्हणजे दोघेही हिंदी सिनेमात व्हिलनची भूमिका साकारायचे. दोघांची भेट एका स्टुडिओमध्ये झाली होती. दोघेही आपापल्या सिनेमाचं शूटिंग तिथे करत होते. अमजद आणि कल्पना यांच्या इतकं प्रेम वाढलं की, दोघे लग्नही करणार होते. पण परिवार वेगळे होण्याच्या भीतीने असे त्यांनी केले नाही. पण तरिही अमजद खान यांनी शेवटपर्यंत कल्पनाला साथ दिली. 

कार अपघात

अमजद खान यांचा मोठा एका कार अपघातात झाला होता. त्यावेळी अमजद खान हे अमिताभ बच्चन यांच्या 'द ग्रेट गॅंबलर' सिनेमात काम करत होते. सिनेमाचं शूटिंग गोव्यात होणार होतं. त्यामुळे अमजद खान हे परिवारासोबत गोव्यासाठी रवाना झाले. दरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला. यात अमजद खान गंभीर जखमी झाले होते. स्टेअरिंग त्यांच्या फुफ्फुसांमध्ये आरपार झालं होतं. या अपघातामुळे ते अमजद खान हे बरेच दिवस व्हिलचेअरवर होते. त्यांचं ऑपरेशन करावं लागलं. त्यामुळे त्यांना अनेक गंभीर आजारही झाले होते. शेवटी २७ जुलै १९९२ मध्ये त्यांचं निधन झालं. 

Web Title: Amjad Khan Death Anniversary : Unknown fact Bollywood's Gabbar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.