आम्रपाली दुबेच्या ‘या’ भोजपुरी गाण्याने तोडलेत सगळे विक्रम; तुम्हीही पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 06:48 AM2017-11-16T06:48:32+5:302017-11-16T12:18:32+5:30
भोजपुरी अभिनेता पवन सिंगसोबत ‘सत्या’ या चित्रपटासाठी आम्रपालीने एक प्रमोशनल सॉन्ग शूट केले होते. आठ महिन्यांपूर्वी २७ मार्चला हे गाणे रिलीज झाले होते.
आ ्रपाली दुबे हे भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव. तीन वर्षांपूर्वी आम्रपालीने भोजपुरी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. तेव्हापासून तिची घोडदौड सुरु आहे. शानदार अभिनय, डान्स आणि एक वेगळीच अदा यामुळे तिची लोकप्रीयता दिवसागणिक वाढते आहे. यु ट्यूबवरील तिची गाणी आवडणा-या लोकांचा आकडा बघितला की, आपल्याला आम्रपालीच्या लोकप्रीयतेचा अंदाज येतो. भोजपुरी अभिनेता पवन सिंगसोबत ‘सत्या’ या चित्रपटासाठी आम्रपालीने एक प्रमोशनल सॉन्ग शूट केले होते. आठ महिन्यांपूर्वी २७ मार्चला हे गाणे रिलीज झाले होते. ‘राते दिया बुताके’ असे बोल असलेले हे गाणे तुफान गाजले होते. अद्यापही या गाण्याने लोकांच्या मनावर चढलेली झिंग उतरलेली नाही. कारण, यु ट्यूबवर या गाण्याने १० कोटींचा आकडा पार केला आहे. कुठल्याही भोजपुरी गाण्याला आत्तापर्यंत हा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे हा एक विक्रम आहे. फार मोजक्या बॉलिवूड गाण्यांना हा आकडा पार करता आला आहे.
आम्रपाली ही भोजपुरी जगताची एकमेव अभिनेत्री आहे, जिच्या पाच चित्रपटांना यु ट्युबवर एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. निश्चितपणे आम्रपाली या उपलब्धीमुळे कमालीची आनंदी आहे आणि तिने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आम्रपालीने अलीकडे खेसारी लाल यादवसोबत ‘दुल्हन गंगा पार’ या भोजपुरी चित्रपटात एक प्रमोशनल सॉन्ग केले आहे.
आम्रपालीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१४ मध्ये ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या भोजपुरी चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि आम्रपाली रातोरात स्टार झाली.गत तीन वर्षांत दीड डझनावर सिनेमांमध्ये ती दिसली आहे. यानंतर ‘पटना से पाकिस्तान’,‘राजा बाबू’, ‘बम बम बोल रहा है’,‘काशी’ हे तिचे चित्रपटही हिट झालेत. गतवर्षी आलेल्या आम्रपालीच्या ‘मोकामा जीरो किलोमीटर’ या आम्रपालीच्या गाण्याला २ कोटींवर व्ह्यूज मिळाले होते.
आम्रपालीने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, लहानपणी तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. पण मायानगरी मुंबईत आल्यानंतर तिचे पाऊले मॉडेलिंगकडे वळलीत.