अमृता रावच्या मुलाचा फोटो पाहिला का? दिसतो खूपच क्यूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 02:04 PM2021-03-18T14:04:24+5:302021-03-18T14:07:04+5:30
अमृता आणि अनमोलने पूर्वी शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या मुलाचा चेहरा दिसला नव्हता. पण आता त्याचा चेहरा अमृताच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. गेल्या 1 नोव्हेंबरला अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अमृता आणि अनमोलने काही दिवसांपूर्वी आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर करत त्याचे नाव चाहत्यांना सांगितले होते. हॅलो, आमचा मुलगा वीरला भेटा, असे लिहित अनमोल आणि अमृताने मुलाचा फोटो शेअर केला होता. पण या फोटोत बाळाचा चेहरा दिसला नव्हता.
आता अनमोलने मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनमोलने शेअर केलेल्या फोटोत वीरला पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे. वीर या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. आमचे जग... आमचा आनंद... असे त्याने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. केवळ पाच तासांत 11 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला असून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता आणि अनमोल अतिशय खाजगी आयुष्य जगणे पसंत करतात. 2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता आणि अनमोल सात वर्षे डेट करत होते. अर्थात अमृताने हे सगळे लपवून ठेवले होते. अमृता आणि अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले.
अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली.
अमृता रावची इमेज ‘गर्ल - नेक्स्ट -डोर’अशीच बनून राहिली. आपल्या करिअरमध्ये ती कुठल्याही विवादात अडकली नाही. पण अशी एक वेळ आली की, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ब्रेकअपसाठी अमृता जबाबदार असल्याची चर्चा झाली.