मुलाला दूध पाजतानाचा अमृता रावचा फोटो शेअर करत आरजे अनमोल म्हणाला- सर्वात सुंदर अन् जादुई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:40 IST2021-03-23T16:11:23+5:302021-03-23T16:40:52+5:30
अमृता रावचा पती आरजे अनमोलने एक फोटो शेअर केले आहे.

मुलाला दूध पाजतानाचा अमृता रावचा फोटो शेअर करत आरजे अनमोल म्हणाला- सर्वात सुंदर अन् जादुई
अमृता रावचा पती आरजे अनमोलने एक फोटो शेअर केले आहे, त्यात आई-मुलाचे बॉन्डिग स्पष्ट दिसते आहे. या फोटोत अमृता आपल्या मुलाला फीड करताना दिसते आहे. अमृता रावने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आरजे अनमोल आपला मुलगा वीरसाठी वडिलांचे कर्तव्य बजावत आहे. आता पापा अनमोलने मुलाला फीड करताना अमृता रावाचा फोटो शेअर केले आहे.
गेल्या 1 नोव्हेंबरला अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला.अमृता आणि अनमोलने काही दिवसांपूर्वी आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर करत त्याचे नाव चाहत्यांना सांगितले होते. काही दिवसांपूर्वी अनमोलने वीरचा फोटो शेअर केले होते. वीर या फोटोत खूपच क्यूट दिसत होतो. आमचे जग... आमचा आनंद... असे त्याने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले होते.
ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असले तरी अमृता आणि अनमोल अतिशय खाजगी आयुष्य जगणे पसंत करतात. 2016 मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता आणि अनमोल सात वर्षे डेट करत होते. अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली.