बेबी आने वाला है...अमृता रावने पहिल्यांदा शेअर केले बेबी बम्पचा फोटो
By गीतांजली | Updated: October 19, 2020 16:26 IST2020-10-19T16:23:55+5:302020-10-19T16:26:22+5:30
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकऊांटवरवरुन बेबी बम्पचा फोटो शेअर केला आहे.

बेबी आने वाला है...अमृता रावने पहिल्यांदा शेअर केले बेबी बम्पचा फोटो
अभिनेत्री अमृका राव आणि पती आर. जे. अनमोल यांनी फायनली घरी नवा पाहुणा येणार असल्याची बातमी ऑफिशयली दिली आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकऊांटवरवरुन बेबी बम्पचा फोटो शेअर केला आहे, यात तिच्यासोबत तिचा पतीसुद्धा दिसतोय. या फोटो शेअर करत अमृताने तिला कितवा महिना सुरु आहे याची माहिती दिलीय.
अमृता रावने या पोस्टमधून फॅन्सपासून प्रेग्नेंन्सीची गोष्ट लपवली याबद्दल माफी मागितली आहे. तुमच्यासाठी हा 10वा महिना आहे पण माझ्यासाठी हा 9वा महिना आहे. माझ्या सर्व चाहत्यांना ही गुडन्यूज सांगून मी खूप उत्साहित आहे.
याचसोबत तिने लिहिलं आमचं पहिलं बाळ लवकरच येणार आहे आणि त्यांचा हा प्रवास खूप रोमांचकारी होता. अमताने #2020baby #2020mom #2020parents सारखे अनेक हॅशटॅग दिले आहेत.
अमृताने जसा फोटो शेअर केला, चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता पतीसोबत आरजे अनमोलसोबत खारमध्ये एका क्लिनिक बाहेर दिसली होती. यावेळी अमृताचा बेबी बम्प स्पष्ट दिसला होता.
2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
नवरा असावा तर असा...! प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री अमृता रावची आरजे अनमोल घेतोय अशी काळजी