जेव्हा अमृता रावनं लगावली होती शाहिद कपूरच्या कानशिलात, काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:43 IST2025-02-25T12:43:31+5:302025-02-25T12:43:43+5:30
म्हणून अमृता रावने लगावली होती शाहिदच्या कानशिलात

जेव्हा अमृता रावनं लगावली होती शाहिद कपूरच्या कानशिलात, काय होतं कारण?
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) यांनी जवळपास एकत्रच बॉलिवूडमधील कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्या दोघांनी एकानंतर एक बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. यातील विवाह, 'इश्क विश्क' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. शाहीद कपूर आणि अमृता रावची जोडी प्रेक्षकांना पसंत होती आणि खऱ्या आयुष्यातही दोघांमध्ये चांगली मैत्री होती. पण, तुम्हाला माहितेय का एकदा अमृता रावनं शाहिदच्या कानशिलात ( Amrita Rao Slapped Shahid Kapoor) लगावली होती. तेही शाहिदच्या आईसमोर. तर तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया.
'इश्क विश्क' हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे शाहिद कपूरने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत अभिनेत्री अमृता राव होती. शाहिद आणि अमृता पहिल्यांदाच 'इश्क विश्क' चित्रपटात एकत्र दिसले होते. 'इश्क विश्क'च्या सेटवर अमृताने शाहिदच्या कानशिलात लगावली होती. परंतु, हे खऱ्या आयुष्यात नसून फक्त सिनेमातील एका दृश्यासाठी तिने हे केलं होतं.
विशेष म्हणजे अमृता शाहिदच्या कानशिलात मारताना अवघडल्यासारखं झालं होतं. कारण, तेव्हा सेटवर निलम (शाहिदची आई) देखील उपस्थित होत्या. तेव्हा आईसमोर मुलाच्या कानाशिलात देताना अमृताला संकोच होत होता. पण, खुद्द निलम यांनी अमृताची समजूत काढली आणि तिला निसंकोच होत शाहिदच्या कानफटात देण्यास सांगितलं आणि अखेर अमृतानं दिग्दर्शकाला हवा अगदी तसा सीन दिला. शाहिद आणि अमृताचा हा 'इश्क विश्क' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'विवाह' चित्रपटात या दोघांची जोडी सर्वाधिक पसंत करण्यात आली होती.