सारा अली खानसोबत काम करण्यास प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला नकार?; खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:26 PM2021-12-06T13:26:05+5:302021-12-06T13:27:06+5:30

Sara ali khan: तीन वर्षांमध्ये साराचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले असून 'अतरंगी रे' हा पाचवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे सारासोबत काम करता यावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असल्याचं पाहायला मिळतं.

amrita singh does not want to work with daughter sara ali khan know the reason | सारा अली खानसोबत काम करण्यास प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला नकार?; खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

सारा अली खानसोबत काम करण्यास प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला नकार?; खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

googlenewsNext

'केदारनाथ' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान(sara ali khan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर साराने केवळ तीन वर्षांमध्येच कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या तीन वर्षांमध्ये तिचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले असून 'अतरंगी रे' हा पाचवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे सारासोबत काम करता यावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, एका अभिनेत्रीला सारासोबत काम करायची इच्छा नसल्याचं सांगण्यात येतं. याविषयी खुद्द सारानेच एक मुलाखतीत खुलासा केला आहे.

सध्या सारा तिच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. अलिकडेच साराने एक मुलाखत दिली असून बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्यासोबत काम करणं फारसं आवडणार नाही हे तिने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे ही लोकप्रिय अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई अर्थात अभिनेत्री अमृता सिंग आहे.

"ती माझ्यासोबत काम करु शकेल असं तिला वाटत नाही. कारण शेवटी ती माझी आई आहे आणि मग सेटवर सुद्धा ती त्याचप्रकारे वावरेल. जर एखादा सीन सुरु असेल आणि माझ्या चेहऱ्यावर एखादा केस आला. तर,लगेच ती तीन कट करेल आणि माझे केस नीट करत बसेल. सहाजिकच आहे, मी पडद्यावर छान दिसावं असंच तिला वाटणार. तिला, मला पडद्यावर बेस्ट पाहायचं आहे हाच त्या मागचा उद्देश. त्यामुळे मी कधीही तिला अशा द्विधा मनस्थितीत टाकेन असं मला वाटत नाही", असं सारा म्हणाली.

दरम्यान, सारा अली खान तिच्या आईच्या प्रचंड जवळ आहे. अनेकदा ती आईसोबत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या आईशी निगडीत काही गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करते. विशेष म्हणजे अद्यापही ही मायलेकीची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकलेली नाही. मात्र, त्या दोघींनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं आहे. 
 

Web Title: amrita singh does not want to work with daughter sara ali khan know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.