Amruta Fadnavis :अज मैं मूड बणा लेया...! अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:38 PM2023-01-05T17:38:24+5:302023-01-05T17:39:03+5:30

Amruta Fadnavis New Song : अमृता यांनी काही दिवसांपूर्वी या गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता त्यांनी या गाण्याचा टीझर शेअर केला आहे.

amruta fadnavis new song mood banaliya teaser out | Amruta Fadnavis :अज मैं मूड बणा लेया...! अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, टीझर पाहिलात का?

Amruta Fadnavis :अज मैं मूड बणा लेया...! अमृता फडणवीस यांचं नवं गाणं, टीझर पाहिलात का?

googlenewsNext

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amruta Fadnavis)  सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. आता त्यांचं आणखी एक नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!’ असे या गाण्याचे बोल आहेत. आता या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. अमृता यांनी काही दिवसांपूर्वी या गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता या गाण्याचा टीझर त्यांनी शेअर केला आहे.

टीझरमध्ये अमृता गाण्यासोबतच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांचा एक वेगळा लुक गाण्यात पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील त्यांच्या हटके लूकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. उद्या 6 जानेवारीला ‘टी सीरिज’चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे. नवीन गाणं हे बॅचलर्सवर आधारित असल्याचं अमृता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दिवाळीच्यानिमित्त त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘जय लक्ष्मी माता’ असे या गाण्याचे बोल होते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत त्यांचं ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...’हे गाणं प्रदर्शित झालं होतं. शिवाय व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘ये नयन डरे डरे’ हे गाणं देखील गायलं होतं.

Web Title: amruta fadnavis new song mood banaliya teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.