सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:20 IST2019-08-10T15:18:00+5:302019-08-10T15:20:28+5:30

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Amruta Subhash entry in sacred games season 2 | सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

ठळक मुद्देअमृता सुभाष सेक्रेड गेम्स २ मध्ये एका रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये रॉ एजंटच्या भूमिकेत आपल्याला राधिका आपटेला पाहायला मिळाले होते.

सेक्रेड गेम्समधील जितेंद्र जोशीच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या वेबसिरिजमध्ये त्याने साकारलेल्या काटेकरची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये काटेकरचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे या सिझनमध्ये आपल्याला जितेंद्र जोशीला पाहायला मिळणार नाहीये. पण आता आणखी एका मराठी कलाकाराची सेक्रेड गेम्सच्या टीममध्ये एंट्री झाली आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या वेबसिरिजची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिझनमध्ये सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी असे काही जुने चेहरे आहेत. पण त्याचसोबत अनेक नवीन कलाकारांची एंट्री झाली आहे. या टीममध्ये आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाषची एंट्री झाली आहे.

अमृताने श्वास, अस्तू, किल्ला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच गल्ली बॉय या रणवीर सिंगच्या चित्रपटात देखील ती झळकली होती. आता ती सेक्रेड गेम्स २ मध्ये एका रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये रॉ एजंटच्या भूमिकेत आपल्याला राधिका आपटेला पाहायला मिळाले होते. पण पहिल्या सिझनमध्ये तिचा खून होतो असे दाखवण्यात आले होते.

‘सेक्रेड गेम्स’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुसऱ्या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर आधारित ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका रसिकांना खूपच भावली. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून, मारामारी, अश्लील संवाद आणि दृश्याने भरलेली ही वेबसीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती लोकप्रियदेखील झाली.

Web Title: Amruta Subhash entry in sacred games season 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.