बॉयफ्रेंडसह प्रेग्नेंट अॅमी जॅक्सन पुलमध्ये चील करताना दिसली, फोटो व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:00 AM2019-08-27T06:00:00+5:302019-08-27T06:00:00+5:30
अॅमीने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती.
सध्या अॅमी जॅक्सन सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करते. याआधी ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असायची तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. त्यावर तिला नेटीझन्सकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात. आता ती तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत असते. आता तिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत अॅमी बॉयफ्रेंडसह पुलमध्ये चील करताना दिसतेय.
फोटोमध्ये अॅमी ब्लू एंड व्हाइट रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत असून पूल शेजारी उभी असल्याचे पाहायला मिळतेय.तर बॉयफ्रेंड जॉर्ज हा पुलमध्ये दिसतोय. यावेळी टेम्प्रेचर 30डिग्री सेल्सियस असून ती दोघेही एन्जॉय करत असल्याचे तिने म्हटले आहे. सप्टेंब-ऑक्टोबर महिन्यात अॅमी बाळाला जन्म देणार आहे. अॅमीने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी तिने गरोदर असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
तसेच पुढच्या वर्षी २०२० मध्ये दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले होते. लग्न पुढे ढकलण्याचे कारणही थोडे आश्चर्यकारक होते. लग्न करण्यासाठी सुंदर बीचचा शोध हे कपल घेत होते. जेव्हा दोघांना त्यांच्या आवडीनुसार बीच मिळेल तेव्हा ते लग्न करतील अशा चर्चा होत्या. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नावाचा एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्ज अॅमीच्या प्रेमात पडला. अॅमी जॅक्सन गेल्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती. अॅमीने ‘एक दिवाना था’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.