नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एमी जॅक्सनने अब्जाधीश प्रियकराशी केला साखरपुडा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:24 PM2019-01-02T13:24:44+5:302019-01-02T13:26:27+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. नव्या वर्षांत बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, एमी जॅक्सन.
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. नव्या वर्षांत बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, एमी जॅक्सन. ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एमीने ही खुशखबर चाहत्यांशी शेअर केली आहे. ‘१ जानेवारी २०१९, एका नव्या प्रवासाचा शुभारंभ...आय लव्ह यू. मला जगातील सर्वात नशिबवान मुलगी बनवण्यासाठी आभार...’, असे एमीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय या पोस्टमध्ये अंगठीचा इमोटिकॉनही शेअर केला आहे.
जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.
एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात २०१२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. नुकताच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज झालो. या चित्रपटात ती मेगास्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली.