'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:26 PM2023-03-21T21:26:56+5:302023-03-21T21:29:17+5:30

दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितला अनुभव

An attempt to reach Prabhu Shriram at the global level through the movie 'Adipurush'! | 'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न!

'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न!

googlenewsNext

समीर नाईक, पणजी (गोवा): भारतात जी श्रीराम प्रभूची प्रतिमा आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे, आणि श्रीराम हे मुळात तसेच आहेत. प्रत्येकाला त्यांच्या वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे श्रीराम काय आहे हे कळत असतो. मला लहानपणी जो श्रीराम कळाला, आणि आता या वयात जो श्रीराम कळाला त्याच्या खुप फरक आहे. आता मला जो श्रीराम कळाला तो लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मी आदीपूरुष चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे, असे मत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

प्रभू श्रीराम यांचे जीवन, त्यांचेे आचरण यातून अफाट गोष्टी शिकण्यासारखे आहेत. आजच्या पिढीला श्रीराम कळावा, त्यांचे जीवन व त्यांनी केलेले समाजाचे उद्धार कळावे, यासाठीच आदीपूरुष मी घेऊन येत आहे. सुमारे ५५० कोटी या चित्रपटाचा बजेट आहे. तसेच प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, देवदत्त नागे, सनी सिंग, वत्सल शेट यासारखे स्टार कलाकार यामध्ये आहे. श्रीरामाचे वेगळे स्वरुप या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
आदीपुरुष हा सध्या हिंदी, आणि तामील भाषेतून प्रदर्शित होणार आहे. तसेच इंग्रजी भाषेत आम्ही हा चित्रपट यापूर्वीच डब केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, जपानी अशा भाषांमध्ये देखील आम्ही डब करणार आहोत, जेणेकरुन आमचे श्रीराम जागतिक स्तरावर पोहचले पाहीजे, त्यांचे कार्य जगातील युवकांकडे पोहचले पाहीजे, असेही राऊत यांनी सांगितले.

प्रभाससोबत काम करणे पर्वणीच

प्रभास हा जागतिक स्तराचा सुपरस्टार आहे, पण जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत काम करता तेव्हा प्रभास खऱ्या अर्थाने कळतो. एवढा मोठा स्टार असला तरी त्याचे पाय अजूनही जमनीवरच आहे. त्याच्या मनात दया, प्रेम या भावना भरलेल्या आहेत. प्रभासच्या डोळयात ती निरागसता आहे, कारण त्याचे मन स्वच्छ आहे. त्याच्यापेक्षा आताच्या काळात प्रभू श्रीरामाची भूमिका कुणीच चांगली करु शकला नसता. त्याच्यासोबत काम करणे म्हणजे प्रत्येकाला पर्वणीच होती, असे राऊत यांनी प्रभाससोबतचा अनुभव सांगताना सांगितले.

 देशातील एैतिहासिक गोष्टीवर असंख्य चित्रपट काढू शकतो

आमच्या देशाला सृदृढ असा इतिहास लाभला आहे. येथे प्रत्येक पैलूवर आपण चित्रपट काढू शकतो. आता एैतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे, असा वाटत असला तरी यापूर्वी देखील अनेक चित्रपट इतिहासांच्या गोष्टींवर आले आहे. माझ्यादृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. कारण आजच्या युवा पिढीला इतिहास कळाला पाहिजे. इतिहासातून खुप काही शिकायला मिळते. आता जर नवभारत निर्माण करायचा असेल तर इतिहास जाणणे आवश्यक आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

कहाणी चांगली की कुठल्याही भाषेतील चित्रपट चालतो

चित्रपटाची कहाणी महत्वाची असते. मुळात कहाणीच चित्रपटाची आत्मा आहे. कहाणी चांगली असली की कुठल्याही भाषेत चित्रपट असला तरी चालतो. आता आधुनिक तंत्रज्ञान देखील खुप मदतीचे ठरत आहे. यातून आपण लोकांना आकर्षित करु शकतो. चित्रपट एकंदरीत चांगला असला की प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतात.

Web Title: An attempt to reach Prabhu Shriram at the global level through the movie 'Adipurush'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.