नेहा धुपियाच्या प्रेग्नेंसीबाबत अंगद बेदीचा खुलासा, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:25 AM2018-11-15T11:25:06+5:302018-11-15T11:59:36+5:30
फायनली नेहा धुपिया ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती हे नेहाचा पती अंगद बेदीने स्वीकारले आहे. या कपलने सीक्रेट वेडिंग मे महिन्यात केली होती तेव्हापासून नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या
फायनली नेहा धुपिया ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती हे नेहाचा पती अंगद बेदीने स्वीकारले आहे. या कपलने सीक्रेट वेडिंग मे महिन्यात केली होती तेव्हापासून नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही गोष्ट या दोघांनी अद्याप स्वीकारली नव्हती.
गत १० मे रोजी दिल्लीच्या गुरूद्वारात दोघांचेही लग्न झाले. या लग्नाला नेहा व अंगदच्या जवळचे अगदी मोजके काही लोक उपस्थित होते. अचानक झालेल्या या लग्नानंतर एक वेगळीच चर्चा रंगली. ती म्हणजे, नेहा लग्नापूवीर्चं प्रेग्नंट असल्याची. प्रेग्नंसीमुळेच नेहा व अंगदने घाईघाईत लग्न उरकले, असेही मानले गेले. मात्र अंगदने या सर्व गोष्टी केवल अफवा असल्याचे सांगितले होते. ही गोष्ट सार्वजनिकपणे स्वीकारण्यास नेहा आणि अंगदने खूप वेळ घेतला. 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये अंगद अखेर खरं बोललाच.
नुकताच अंगद नेहा धुपियाचा शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये आला होता. यावेळी त्यांने आपले अनेक वैयक्तिकबाबींचा खुलासा केला ज्याआजपर्यंत नेहादेखील माहिती नव्हत्या. याचवेळी त्यांने ही गोष्टदेखील कबुल केली की, ''नेहा लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती.'' ऐवढेच नाही तर त्यांने हे देखील सांगितले की, ''नेहा लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट असल्याचे समजताच तिच्या आई-वडिलांना धक्का बसला होता. अंगद पुढे म्हणाला मला यानंतर खूप ओरडा बसला होता. मला नाही वाटतात या बातमीसाठी कुणी तयार होते.''
नेहा धूपिया आणि अंगद बेदीने लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवॉक केला होता. बेबी बम्पसोबत तिचा हा पहिला रॅम्पवॉक होता. हा ट्रेंड करिना कपूरने सेट केला होता. नेहाने त्याचाच कित्ता गिरवला.