‘अनकही...’ साहिर व मीराची काव्यमय प्रेम कहाणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 01:02 PM2017-04-14T13:02:30+5:302017-04-14T18:34:28+5:30

या काव्यमय प्रेम कहाणीमध्ये जळगावच्या तन्वी आनंद मलारा यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली असून अवघ्या दोन दिवसात यु-ट्यूबवर ४५० प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

'Anakhi ...' poetry love story of Sahir and Meera! | ‘अनकही...’ साहिर व मीराची काव्यमय प्रेम कहाणी !

‘अनकही...’ साहिर व मीराची काव्यमय प्रेम कहाणी !

googlenewsNext
-Rav
indra More
आयुष्यात प्रेम आणि करिअर या दोन्ही जबाबदारी पार पाडत असताना मनातील अव्यक्त भावना ‘अनकही’ या साडे बारा मिनिटांच्या लघुपटात साहिर व मीराने मांडली आहे. या काव्यमय प्रेम कहाणीमध्ये जळगावच्या तन्वी आनंद मलारा यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली असून अवघ्या दोन दिवसात यु-ट्यूबवर ४५० प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

काय आहे काव्यमय प्रेमकहाणी...
लघुपटात साहिरच्या भूमिकेत अजिंक्य पाटील तर मीराच्या भूमिकेत तन्वी मलारा आहे. साहिर याला कविता व शेरो शायरीची आवड आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम असताना मीराचे वडिल तिनेआयएएसबनावेयासाठी दिल्ली येथे पाठविण्याचा निर्णय घेतात. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आणि त्याचबरोबर साहिरसोबत विवाह हे दोनच ध्येय आयुष्यात असल्याचे मीरा निरोप घेतेवेळी सांगते.
साहिरच्या हाताने सिंदूरभरल्यानंतर एक वर्षाने परत येण्याचे वचन देत मीरा दिल्लीला रवाना होते. दरम्यान, काहीवर्षांचा कालावधी लोटल्यानंतर साहिरचा शोध घेत मीरा त्याच्या घरी पोहचते. गतकाळातील आठवणींना उजाळा दिल्यानंतर परस्परांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विचारणा करतात. त्यातच मीरा साहिरचा निरोप घेते आणि लघुपट संपतो.

लघुपटातील संगीत आणि फ्लॅश बॅक अप्रतिम
साडे बारा मिनिटाच्या या लघुपटात दिग्दर्शक श्रवण खरात यांनी दृष्यांना साजेसे हिंदी चित्रपटांचे गीत घेतलेआहेत. त्यासोबतच मीरा आणि साहिर यांच्या गतकाळातील दृष्यांचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे. ५ ते ८ एप्रिल दरम्यान पुणे येथे एनआयबीएम रस्त्यावरील एका बंगल्यात या लघुपटाचे शुटींग झाले आहे. या लघुपटाचे लेखक टिकम शेखावत हे स्वत: कवी असून साहिरच्या पात्राद्वारे त्यांनी शेरोशायरी व कविता सादर केल्या आहेत.

"अनकही या लघुपटात साहिर व मीरा यांची काव्यमय प्रेमकहाणी चित्रित करण्यात आली आहे. प्रेम आणि करीअर यासोबत दोघांच्या मनातील व्यक्त न झालेली भावना या लघुपटाद्वारे मांडली आहे. आगामी काळात ‘प्यार एक तरफा’ सह अन्य लघुपटांमध्ये काम करणार आहे."
-तन्वी मलारा, नायिका, अनकही.

दोन दिवसात ४५० दर्शकांनी दिली पसंती
‘अनकही’ या लघुपटाचे मंगळवारी अनावरण करीत यु-ट्यूबवर अपलोड करण्यात आला. या दरम्यान दोन दिवसात ४५० दर्शकांनी या लघुपटाला पसंती दिली आहे. तर फेसबुकवर देखील १०० पेक्षा जास्त नागरिकांनी शेअर केला आहे.  आगामी काळात ‘प्यार एक तरफा’ या लघुपटाच्या निमित्ताने तन्वी मलारा प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: 'Anakhi ...' poetry love story of Sahir and Meera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.