आनंद अहुजामुळे वाढली सोनम कपूरची चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 06:12 PM2016-12-28T18:12:16+5:302016-12-28T18:14:09+5:30

Sonam Kapoor upset about rumours with Anand Ahuja ; आनंद अहुजा व सोनम कपूर एकमेकांना डेट करीत असून दोघेही एकमेकाच्या प्रेमात आक ांत बुडले आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे आनंद अहुजा याला सोनमचा बॉयफ्रेण्ड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.

Anand Ahuja's sonam Kapoor worried! | आनंद अहुजामुळे वाढली सोनम कपूरची चिंता!

आनंद अहुजामुळे वाढली सोनम कपूरची चिंता!

googlenewsNext
ong>बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. तिचे फटकळ बोलण्यामुळे अनेकांची फजिती होते अशा चर्चा रंगतच असतात. मात्र सध्या तिच्याविषयी रंगलेल्या एका चर्चेमुळे ती चांगलीच फजित झाली आहे. सोनम कपूरचे नाव आनंद अहुजा सोबत जोडले जात असल्याने ती चांगलीच नव्हर्स असल्याचे सांगण्यात येते. 

२०१६ सालात सोनमचा नीरजा हा चित्रपट चांगलाच गाजला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले जात आहे. बहिण रेहा कपूर हिच्या दिग्दर्शनात तयार होणारा सोनमचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ करिना कपूरच्या प्रेग्नेंसीमुळे अडकला आहे. यामुळे ती सध्या सुट्या एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये आहे. मात्र, या सुट्या एन्जॉय करताना तिच्या विषयी रंगलेली एक चर्चा तिच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तिचे नाव आनंद अहुजा या युवकाशी जोडण्यात येत आहे. 



आनंद अहुजा फॅशन उद्योजक असून त्याच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलाच व्हायरल होत आहे. यात दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. या फोटोचे व्हायरल होणे सोनमला रुचले नसून ती यामुळेच चिंतेत आहे. सोनम आपल्या खाजगी जीवनाबद्दल कोणत्याच गोष्टी उघड करू इच्छित नसून तिला कुणाचा बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड म्हणून ओळख मिळवायची नाही तर आपल्या अभिनयाने ओळखले जावे असे तिला वाटते. 

आनंद अहुजा व सोनम कपूर एकमेकांना डेट करीत असून दोघेही एकमेकाच्या प्रेमात आक ांत बुडले आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे आनंद अहुजा याला सोनमचा बॉयफ्रेण्ड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच सोनमने आपले नाव कुणाशीच जोडू दिले नाही. प्रेम व बॉयफ्रेण्ड या लोच्यापासून ती दोन हात लांब राहिलेली आहे. 


">http://

Web Title: Anand Ahuja's sonam Kapoor worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.