लग्न नक्की कोणाचं? अंबानींच्या हळदीत बेभान होऊन नाचला रणवीर सिंग, हार्दिकचीही मिळाली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:33 PM2024-07-26T16:33:48+5:302024-07-26T16:35:45+5:30

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील एक व्हिडिओ समोर आला आहे. अनंत-राधिकाच्या हळदीतील या Inside व्हिडिओमध्ये रणवीर आणि हार्दिकने फूल धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे.

anant ambani radhika merchant wedding ranveer singh and hardik pandya dance in haldi ceremony video viral | लग्न नक्की कोणाचं? अंबानींच्या हळदीत बेभान होऊन नाचला रणवीर सिंग, हार्दिकचीही मिळाली साथ

लग्न नक्की कोणाचं? अंबानींच्या हळदीत बेभान होऊन नाचला रणवीर सिंग, हार्दिकचीही मिळाली साथ

Anand Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या धाकट्या लेकाचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला.  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने १२ जुलैला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अनंत-राधिकाच्या हळदी समारंभाची झलक पाहायला मिळत आहे. अनंत-राधिका हळदीच्या रंगात रंगल्याचं दिसत आहे. तर अंबानी कुटुंबीयातील इतर सदस्यांनीही हळदी कार्यक्रमात धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. वरमाई नीता अंबानींसुद्धा लाडक्या लेकाची हळद मनापासून एन्जॉय केली आहे. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी...

अनंत-राधिकाच्या हळदीतील या Inside व्हिडिओमध्ये रणवीर आणि हार्दिकने फूल धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. हळदी डान्सपासून ते ड्रम वाजवण्यापर्यंत प्रत्येक मोमेंट त्यांनी एन्जॉय केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


अनंत-राधिकाने १२ जुलैला लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडबरोबर हॉलिवूड कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याबरोबरच मराठी सेलिब्रिटींनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. लग्नानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन आणि आशीर्वाद सेरेमनीही ठेवण्यात आली होती. अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, गिरिजा ओक, प्रियांका बर्वे या मराठी कलाकारांना अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण देण्यात आलं होतं. 

Web Title: anant ambani radhika merchant wedding ranveer singh and hardik pandya dance in haldi ceremony video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.