राधिकानं सर्वांसमोर किंग खानला म्हटलं 'अंकल', तुम्ही पाहिला का व्हिडीओ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:30 IST2024-07-18T14:11:02+5:302024-07-18T14:30:41+5:30
जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

राधिकानं सर्वांसमोर किंग खानला म्हटलं 'अंकल', तुम्ही पाहिला का व्हिडीओ ?
अवघ्या जगभरात ज्या शाही विवाहाची चर्चा होती, असे अनंत आणि राधिका अंबानीचे लग्न 12 जुलै रोजी पार पडले आहे, अनंत-राधिका आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. या शाही लग्न सोहळ्याआधी राधिका आणि अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनची देखील जगभरात चर्चा होती. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातच आता एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये किंग खान शाहरुख आणि अनंत- राधिका हे मंचावर असल्याचं पाहायला मिळत आहेत. यामध्ये राधिका शाहरुखला अंकल म्हणत असल्याचं दिसून आलं. राधिका आणि शाहरुखचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. राधिकानं शाहरुखला अंकल संबोधल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये फक्त शाहरुख सहभागी झाला नव्हता. तर त्याने धमाकेदार परफॉर्मन्सदेखील दिला होता. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. अंबानी कुटुंब आणि अभिनेता शाहरुख खान यांचे देखील एकमेकांसोबत संबंध चांगले आहेत. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात शाहरुख खान त्याच्या कुटुंबासोबत उपस्थित असतो.