अनन्या आणि साराचं एकत्र वर्कआउट, सोशल मीडियावर होतेय व्हिडीओची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:06 PM2023-10-27T16:06:18+5:302023-10-27T16:08:36+5:30
अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी एकत्र वर्कआउट केलं.
बॉलिवूड जगतातील अनेक अभिनेत्यांचं कसदार, पिळदार शरीर तसेच अभिनेत्र्यांची हॉट, स्लिम अँड फिट शरिरयष्ठी पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. त्यांनी एवढं आकर्षक शरिर कसं कमवलं याचं आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे या यापैकीच एक. नुकतेच दोघींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे व्यायाम करताना दिसत आहेत.
प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सारा आणि अनन्या वर्कआउट करताना पाहायला मिळत आहेत. पुरोहितने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, 'सारा आणि अनन्या यांच्या आजच्या वर्कआउटची ही एक झलक आहे. प्रामाणिकपणे, व्यायाम करणे नेहमीच आनंददायक असलं पाहिजे. फिटनेसचे विविध पैलू आहेत'. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.
सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघीही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी आहेत. अर्थात बॉलिवूडमध्ये दोघींनीही आपल्या चित्रपटातून वेगळं स्थान निर्माण केलं आहे. थोड्याफार फरकानं एकामागोमाग एक बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या दोघींचा सोशल मीडियावरही बराच मोठा चाहतावर्ग आहे. दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' हा चित्रपटही आहे. तर अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेला 'ड्रीम गर्ल 2' सिनेमा रिलीज झाला. आता लवकरच ती 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे.