बॉयफ्रेंडसोबतच्या लीक झालेल्या फोटोवर अनन्या पांडेनं सोडलं मौन, म्हणाली - "मला फरक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:43 IST2024-01-23T19:42:56+5:302024-01-23T19:43:36+5:30
Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते.

बॉयफ्रेंडसोबतच्या लीक झालेल्या फोटोवर अनन्या पांडेनं सोडलं मौन, म्हणाली - "मला फरक..."
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. तिच्या लव्ह लाईफबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या वर्षी ती तिचा बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapoor)सोबत व्हॅकेशनला गेली होती. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर नुकतेच अनन्याने मौन सोडले आहे.
अनन्या पांडेने एका मुलाखतीत खुलासा केला की, जेव्हा तिचे जे फोटो सार्वजनिकपणे शेअर करायचे नसतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा त्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. ती म्हणाली, 'मला त्रास होतो असे मी म्हणू शकत नाही. कलाकार म्हणून आम्ही स्वतः यासाठी साइन अप केले आहे. ते होणार आहे आणि लोक त्यासाठी उत्सुक असतात.
''तो माझ्या कामाचा भाग आहे...''
ती पुढे म्हणाली, 'जे शक्य तितके महत्त्वाचे आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी मर्यादा ठेवणे हे आपल्यावर अवलंबून आहे आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. मला त्याचा त्रास होऊ शकत नाही कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. मला शक्य आहे तेवढे मी फक्त नियंत्रित करू शकते. यासोबतच अनन्याने तिच्याबद्दल लोकांच्या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'जेव्हा मी लोकांना सांगते की मला वाचायला आवडते तेव्हा ते अवाक् होतात. मला विचारतात की तू वाचन करतेस? पण मला ते आवडते. एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचणे ही माझी आवडती गोष्ट आहे. गहरियांच्या शूटिंगदरम्यान मी सेटवर वाचन करायचे. शकुन बत्रा आणि सगळे हसायला लागले आणि म्हणू लागले की तू खरंच वाचन करत नाहीस ना?
वर्कफ्रंट
२०२३ हे वर्ष अनन्या पांडेसाठी खूप चांगले ठरले. अनन्याचे 'ड्रीम गर्ल २' आणि 'खो गये हम कहाँ' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अनन्याने 'खो गये हम कहाँ'मधील तिच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना पूर्णपणे प्रभावित केले आहे. आगामी सिनेमांमध्ये अनन्या पांडे 'कंट्रोल' आणि 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर'मध्ये दिसणार आहे.