अनन्या पांडेने लग्नाबाबत केला मोठा खुलासा केला, म्हणाली तर मी लवकर लग्न करु शकते !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:42 IST2019-12-02T14:28:50+5:302019-12-02T14:42:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून अनन्यांचे नाव कार्तिक आर्यनशी जोडण्यात येते आहे.

अनन्या पांडेने लग्नाबाबत केला मोठा खुलासा केला, म्हणाली तर मी लवकर लग्न करु शकते !
अनन्या पांडे 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. लवकरच ती 'पति, पत्नी और वो'मध्ये दिसणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती बिझी आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार अनन्याने तिच्या पर्सनल लाईफबाबत एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे.
'पति, पत्नी और वो' सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी भूमी आणि कार्तिकने लगेच अनन्या इशारा केला. यावर अनन्या म्हणाली, तुम्हाला दोघांना असे वाटते की मी आधी लग्न करावं. मी जोवर 30 वर्षांची होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही.'' पुढे ती म्हणाली, जर ती कोणाच्या प्रेमात पडली तर ती 30 च्या आधी सुद्धा लग्न करु शकते.
१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. आता हा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.