'मच्छरदाणीचा ड्रेस' घालून अनन्या पांडेचा पॅरिसमध्ये रॅम्पवॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:37 PM2024-01-23T12:37:34+5:302024-01-23T12:38:25+5:30

'मच्छरदाणीचा ड्रेस' घालून पॅरिसला पोहोचली अनन्या पांडे, व्हिडिओ होतोय व्हायरल

ananya panday troll for wearing machachar dani dress in paris Haute Couture week video viral | 'मच्छरदाणीचा ड्रेस' घालून अनन्या पांडेचा पॅरिसमध्ये रॅम्पवॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

'मच्छरदाणीचा ड्रेस' घालून अनन्या पांडेचा पॅरिसमध्ये रॅम्पवॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चंकी पांडे यांची लेक असलेल्या अनन्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. स्टारकिड असलेल्या अनन्याला अल्पावधतीच लोकप्रियता मिळाली. 'स्टुडंट ऑफ द इयर २' या सिनेमातून पदार्पण केलेल्या अनन्याने नंतर अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. अनन्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकून घेणारी अनन्या फॅशनसाठीही ओळखली जाते. 

नुकतंच अनन्याने पॅरिसमध्ये एका फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील तिचा व्हिडिओ समोर आला आहे. अनन्याने या फॅशन वीकसाठी खास ड्रेस परिधान करत रॅम्पवॉक केला. डिझायनर राहुल मिश्रा यांनी डिझाइन केलेला 'मच्छरदाणीचा ड्रेस' घालून अनन्या या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन अनन्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती काळ्या रंगाचा ट्यूब ड्रेस घालून समोर मच्छरदाणी घेऊन चालताना दिसत आहे. अनन्याचा हा लूक मात्र नेटकऱ्यांच्या फारसा पसंतीस पडलेला दिसत नाही. या व्हिडिओवर कमेंट करत अनन्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

"हाच ड्रेस जर उर्फीने घातला असता तर", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "तुझं झालं की मच्छरदानी परत करून टाक", असं म्हटलं आहे. "उर्फी भारताच्या बाहेर गेली व्वा", अशी कमेंटही केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, "मच्छरचा सीझन आला आहे का? मच्छरदानी घेऊन फिरत आहेस." तर एकाने "नवीन उर्फी आली आहे", असंही म्हटलं आहे. 

दरम्यान, अनन्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'खो गए हम कहां' सिनेमात झळकली होती. नेटफ्लिक्सवर अनन्याचा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अनन्याने दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबईत नवं घरही खरेदी केलं. 

Web Title: ananya panday troll for wearing machachar dani dress in paris Haute Couture week video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.