नो मेकअप लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, पायातल्या स्पेशल चपलांची चर्चा, किंमत इतकी की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:34 IST2025-02-21T15:34:36+5:302025-02-21T15:34:51+5:30
सध्या अनन्याच्या चप्पलांची चर्चा रंगली आहे.

नो मेकअप लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, पायातल्या स्पेशल चपलांची चर्चा, किंमत इतकी की...
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. सध्या हिंदी सिनेसृष्टीत अनन्या स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करते आहे. आपले वडील चंकी पांडे (Chunky Pandey) यांच्या पावलावर पाऊल ठेवत ती देखील अभिनय क्षेत्रात नाव कमावते आहे. अनन्या पापाराझींचीही फेवरेट आहे. कधी जीमला जाताना, तर कधी एअरपोर्टवर, तर कधी कामानिमित्त घराबाहेर पडताच अनन्याला पापाराजी कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनन्याच्या फॅशनविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. अनन्याचे फोटो, तिचा फॅशन सेन्स, तिचा लूक आणि ती काय परिधान करते, या सगळ्यांबाबतच बरीच चर्चा आहे. आता सध्या अनन्याच्या चप्पलांची चर्चा रंगली आहे.
नुकतंच अनन्या ही पापाराझींच्या कॅमेरात कैद झाली. यावेळी ती अगदी सिंपल लूकमध्ये होती. पण, तरीही ती अतिशय सुंदर दिसत होती. पिवळ्या धमक रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून आल्याचं दिसलं. अनन्यानं पिवळा कुर्ता आणि पांढरा सुती प्लाझो परिधान केला होता. यावर ती नो मेकअप लूकमध्ये होती. विशेषत: यावर अनन्यानं पांढऱ्या रंगाचे चप्पल घातले होते. आता तिने घातलेल्या चपलांची चर्चा होताना दिसत आहे. याचे कारणही तसेच आहे, कारण अगदी साध्या वाटणाऱ्या या चपलांची किंमत खूप जास्त असल्याने नेटीझन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.
अनन्यानं घातलेली ही साधीसूधी चप्पल नव्हती. तिची किंमत ऐकल्यावर तुम्हलाही धक्का बसेल. ही चप्पल हर्मीस ओरन ब्रँड आहे. हर्मीस ओरन ब्रँडच्या साइटवरवर तिची किंमत ८०० डॉलर्स अर्थात भारतीय चलनात अंदाजे ६९,२५३.२२ रुपये लिहलेली आहे. अर्थात ही एवढी साधी दिसणारी चप्पल तब्बल ७० हजार रुपयांची आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे त्या साधंसुधं थोडीच वापरणार आहेत. ही चप्पल फ्लॅट असल्याने कम्फर्टेबल असावी. तसेच त्याचे पट्टेही थोडे जाडसर असल्याने चालताना त्या सोयीच्या असाव्यात.
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वर्ष २०२५ हे तिच्यासाठी खास ठरणार असल्याचं दिसतंय. अनन्याच्या 'शंकरा' महत्त्वपूर्ण चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. तर 'चांद मेरा दिल' या चित्रपटातही दिसणार आहे. याखेरीज 'गली बॅाय'च्या सिक्वेलमध्ये अनन्याची जोडी विकी कौशलसोबत जमल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर फिल्ममेकर इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) चित्रपटातही ती काम करत असल्याचे समजते.अनन्या पांडेचा मागच्या वर्षी 'सीटीआरएल' हा चित्रपट रिलीज झाला होता. याखेरीज 'बॅड न्यूज'मध्ये तिने कॅमिओ केला होता. करियर सुरू होऊन जवळपास सहा वर्षे होत आली तरी अद्याप अनन्याच्या नावावर सुपरहिट चित्रपटाची नोंद नाही. भविष्यात मात्र ती ही उणीव भरून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.