अनन्या पांडेची 'Call Me Bae' सीरिज OTT वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:08 PM2024-05-28T15:08:39+5:302024-05-28T15:24:47+5:30

अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ananya Panday’s web series ‘Call Me Bae’ to release on OTT on THIS date | अनन्या पांडेची 'Call Me Bae' सीरिज OTT वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे!

अनन्या पांडेची 'Call Me Bae' सीरिज OTT वर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे!

अभिनेत्री अनन्या पांडेबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  फार कमी वेळात अनन्या पांडे हिने अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपुर्वीच अनन्याने  'खो गये हम कहाँ' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. आता ती सीरिजमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. अनन्याची 'Call Me Bae' ही सीरिज लवकरच  प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अनन्याची वेगळी स्टाईल पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे

 'Call Me Bae' या सीरिजची रीलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. धर्मॉ प्रॉडक्शनने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर  'Call Me Bae' चं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्रीच अतिशय सुंदर लूकमध्ये पाहायला मिळत आहे. ही सीरिज येत्या 6 सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित केली जाणार आहे. अनन्या पांडे व्यतिरिक्त या सीरिजमधअये वीर दास, गुरफतेह परिजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफरी असे अनेक स्टार्स झळकणार आहेत.

अनन्या हिने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  'Call Me Bae' या सीरिजशिवाय अनन्या विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित सायबर-थ्रिलर 'कंट्रोल'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार स्टारर 'शंकारा' या चित्रपटातही दिसणार आहे. चित्रपटांशिवाय अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.  अनन्या आणि आदित्य रॉय कपूर गेल्या २ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. पण, काही दिवसांपुर्वीच त्यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती पसरली. पण, त्यानंतर हे लव्हबर्ड्स पुन्हा एकदा सोबत दिसले. त्यामुळे 'कभी हा कभी ना' म्हणत अनन्या आणि आदित्य मध्ये पॅचअप ब्रेकअप सुरु आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

Web Title: Ananya Panday’s web series ‘Call Me Bae’ to release on OTT on THIS date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.