हो त्यांचं ब्रेकअप झालंय! आदित्य कपूर-अनन्या पांडेच्या नात्याबाबत जवळच्या मित्राचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्यांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:37 PM2024-05-06T12:37:33+5:302024-05-06T12:38:09+5:30
२ वर्षांच्या डेटिंगनंतर आदित्य-अनन्याचं ब्रेकअप? मित्राचा मोठा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अनन्या आणि आदित्यला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात होतं. पण, याबाबत दोघांनाही जाहीरपणे कबुली दिली नव्हती. आता अनन्या आणि आदित्यच्या नात्यात दुरावा आल्याचं समजत आहे. त्या दोघांचंही ब्रेकअप झाल्याचा खुलासा जवळच्या मित्राने केला आहे.
एका महिन्याअगोदरच आदित्य आणि अनन्याचं ब्रेकअप झाल्याचं त्यांच्या मित्राने सांगितलं आहे. "आदित्य आणि अनन्याचं गेल्याच महिन्यात ब्रेकअप झालं आहे. त्यांचं नात खूप छान होतं. त्यामुळे ब्रेकअप झाल्याचं कळल्यानंतर आमच्यासाठीही हा धक्का होता. अनन्या यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मित्रांबरोबर ती वेळ घालवत आहे. तर आदित्यही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे," असं आदित्य-अनन्याच्या मित्राने ईटाइम्सशी बोलताना सांगितलं.
गेल्या दोन वर्षांपासून अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत आहेत. गेल्याच महिन्यात अनन्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. "जे खरोखर तुमच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी परत येईल. ते साथ सोडेल तुम्हाला धडे शिकवण्यासाठी जे फक्त तुम्ही स्वतःहूनच शिकू शकता. ते जर खरोखर तुमच्यासाठी असेल तर ते परत येईल जरी तुम्ही कितीही त्यास नकार दिला तरीही. इतके सुंदर काही आपले असू शकत नाही असे जरी आपण गृहीत धरले तरीही. कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापासून वेगळे कधीच होऊ शकत नाही. ते तुमच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेले असतेच,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. तिच्या या पोस्टमुळे अनन्या-आदित्यच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं.
आदित्य किंवा अनन्याने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केलेलं नव्हतं. पण, अनेक पार्टीमध्येही ते एकत्र दिसून आले होते. त्यांनी त्यांचं नात ऑफिशियल केलं नव्हतं. तसंत त्यांनी ब्रेकअपबाबतही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.