'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:19 IST2019-01-19T15:12:15+5:302019-01-19T15:19:09+5:30
'पती, पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता याची अधिकृत्य घोषणा करण्यात आली आहे

'पती पत्नीच्या और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत दिसणार भूमी-अनन्या
'पती, पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. कार्तिक आर्यन या रिमेकमध्ये दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. आता याची अधिकृत्य घोषणा करण्यात आली आहे. १९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासह भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेची वर्णी लागली आहे.
१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिमेकमधील कथेची मांडणीही याच अंगाने जाणारी असल्याचे दिग्दर्शक मुदस्सर अझीम यांनी सांगितले होते. या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येणार आहे. टी-सीरिज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी महिन्यापासून सुरु करणार आहे. भूमी पेडणेकरने तिघांचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच भूमी आणि अनन्यांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
या चित्रपटासाठी आधी तापसी पन्नूचे नाव फायनल करण्यात आले होते. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावर तापसीचा पार चांगलाच चढला आहे.