अनारकली आॅफ आरा : स्वरा भास्कर गाणार अश्लिल गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 11:48 AM2017-01-28T11:48:08+5:302017-01-28T18:01:40+5:30
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. ‘निल बटे सन्नाटा’ या चित्रपटात मुख्य ...
अ िनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. ‘निल बटे सन्नाटा’ या चित्रपटात मुख्य भूमिका सारकल्यानंतर आगामी चित्रपटातून ती ‘देशी गायिके’च्या रूपात दिसणार आहे. स्वरा भास्कर अशी ‘देशी गायिका’ जी अश्लिल गाणे गाते.
वाचून आश्चर्य वाटले ना!, स्वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली आॅफ आरा’ या चित्रपटात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट म्युझिकल ड्रामा असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटात स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गाते. एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते, भीती आणि विस्थापन हे तिच्या जीवनाचा भाग होतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. २४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असून अविनाश दास याने या चित्रपटाची कथा व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पूर्वाश्रमी पत्रकार असणारा अविनाश याचा हा पहिला चित्रपट आहे.
आपल्या चित्रपटाबद्दल स्वरा म्हणाली, हा असा चित्रपट आहे जो सर्वांनी पहायला हवा यासोबतच तिने आपल्या आगामी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. स्वरा भास्करसह या चित्रपटात संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी व इश्कियाक खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी अविनाश म्हणाला, अनारकली आपल्या गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात दडलेल्या भावनांचे विश्व उलगडते, तिला ऐकणारे तिच्यावर प्रेम करू लागतात, या संगीताच्या यात्रेत तिच्यावरील लोकांचे प्रेम अधिक गडद होऊ लागते. तिच्या प्रेमाचा भूतकाळ आहे, सेक्सबद्दल ती पारंपारिक विचार करणारी नाही. ऐवढे असूनही तिला स्वत:चा आत्मसन्मान आहे याची जाणीव ती करून देत असते. Read More : संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड
अनारकलीवर प्रेम करणार पाच लोक आहेत, सर्व आपल्या परिने तिच्यावर प्रेम करीत आहे. मात्र पाचही जणांत एक समान धागा आहे. प्रेमाचा प्रवास अनारकलीला एकटीनेच करायचा आहे असे या चित्रपटाचा गाभा आहे. या चित्रपटात स्वराने आपल्या अभिनयाच्या बळावर अनारकली जिवंत केली आहे. अविनाशच्या मते अशी भूमिका पडद्यावर कुणीच साकारली नाही. स्वराच्या या नव्या रुपावर चाहते किती मोहित होतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेल.
ALSO READ
स्वरा भास्करजवळ ‘या’ गोष्टीसाठी नाही वेळ!
आय अॅम इन हॅप्पी स्पेस - स्वरा

Ji! Aapkey aashirwaad se :) #Announcement people! #AnaarkaliOfAaraah 24th March 2017 directed by @avinashonly This one is a not-to-be-missed https://t.co/1PiQBqghya— Swara Bhaskar (@ReallySwara) January 25, 2017