चीनी बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ची ‘अंधाधुन’ कमाई! १३ दिवसांत कमावले २०० कोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 02:08 PM2019-04-15T14:08:35+5:302019-04-15T14:08:55+5:30
आयुष्यमान खुराणाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. अनेक विक्रम आपल्या नावावर करत,आयुष्यमानच्या या चित्रपटाने चीनमध्ये २०० कोटींची कमाई केली आहे.
आयुष्यमान खुराणाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. अनेक विक्रम आपल्या नावावर करत,आयुष्यमानच्या या चित्रपटाने चीनमध्ये २०० कोटींची कमाई केली आहे. याचसोबत आयुष्यमान, राधिका आपटे आणि तब्बू स्टारर आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ चीनमध्ये बंपर कमाई करणारा पाचवा भारतीय चित्रपट ठरला आहे. यापूर्वी दंगल, सीक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान आणि हिंदी मीडियम या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर अशीच बक्कळ कमाई केली होती.
#AndhaDhun crosses $ 30 million / ₹ 200 cr in #China... Biz on [second] Sat and Sun is *higher* than [first] Sat and Sun... [Week 2] Fri $ 2.03 mn, Sat $ 4.45 mn, Sun $ 3.78 mn. Total: $ 30.06 mn [₹ 208.17 cr]... Power of solid content!
— taran adarsh (@taran_adarsh) 15 अप्रैल 2019
भारतात या चित्रपटाने सुमारे ७५ कोटींचा बिझनेस केला होता. पण चीनमध्ये उण्यापु-या १३ दिवसांत या चित्रपटात २०८.१७ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. चीनी बॉक्स ऑफिसवर ‘पियानो प्लेअर’ नावाने हा चित्रपट रिलीज करण्यात आलाय. चीनच्या ५००० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Top 5... Highest grossing *Indian films* in China...
— taran adarsh (@taran_adarsh) 15 अप्रैल 2019
1. #Dangal
2. #SecretSuperstar
3. #BajrangiBhaijaan
4. #HindiMedium#AndhaDhun is all set to surpass *lifetime biz* of #HindiMedium and emerge the fourth highest grossing film in #China.
‘अंधाधुन’ केवळ ३२ कोटी रूपयांत बनून तयार झाला होता. ही लागत चित्रपटाने कधीच वसूल केली आहे. जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. याबाबतीत रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ आणि अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ला ‘अंधाधुन’ने मागे टाकले आहे.
‘अंधाधुन’मध्ये आयुष्यमानने आकाश नामक पात्र साकारले आहे. दृष्टिहिन असल्याचे नाटक करणारा आकाश एक पियानो वादक असतो. याचदरम्यान आकाश चुकून एक हत्या होताना बघतो आणि या एका घटनेने त्याचे आयुष्य बदलते.