करण जोहरच्या सिनेमात जान्हवी कपूरसोबत दुलकीर सलमान नाही तर 'हा' अभिनेता करणार रोमांस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 14:08 IST2018-12-17T13:40:41+5:302018-12-17T14:08:18+5:30
जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. धडकनंतर जान्हवीची वर्णी करण जोहरच्या 'तख्त'मध्ये लागली आहे. जान्हवी धर्मा प्रोडक्शनच्या आणखीन एका सिनेमात दिसणार आहे.

करण जोहरच्या सिनेमात जान्हवी कपूरसोबत दुलकीर सलमान नाही तर 'हा' अभिनेता करणार रोमांस
ठळक मुद्देअंगद जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अंगद यात एका क्रिकेट कर्णधाराच्या रूपात आहे
जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. धडकनंतर जान्हवीची वर्णी करण जोहरच्या 'तख्त'मध्ये लागली आहे. जान्हवी धर्मा प्रोडक्शनच्या आणखीन एका सिनेमात दिसणार आहे. तिने धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमातूनच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
'तख्त' हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. नुकतीच जान्हवी करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये दिसली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील व करियरबाबत गोष्टी शेअर केल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसारा हा सिनेमा भारतीय वायुदलातील वैमानिक गुंजन सक्सेना यांचा बायोपिक असणार आहे. गुंजन या करगिल युद्धाचा भाग होत्या. मीडिया रिपोर्टनुसार यात आधी दुलकर सलमानला कास्ट करण्यात आले होते मात्र आता त्याची जागा अंगद बेदीने घेतली आहे. अंगद जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंगद यात एका क्रिकेट कर्णधाराच्या रूपात आहे. दुलकर सलमानला सिनेमातून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला यामागाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अंगदने याआधी 'सूरमा' आणि 'टायगर जिंदा है'सारख्या सिनेमात दिसला होता.