​नाराज आहे जॉन अब्राहम! ‘परमाणु’ आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 09:15 AM2018-01-12T09:15:09+5:302018-01-12T14:45:09+5:30

जॉन अब्राहम दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. चित्रपटगृहात जॉनचा चित्रपट येऊन बराच काळ लोटलाय.  अशास्थितीत जॉनला लगेच अ‍ॅक्टिव्ह होणे गरजेचे ...

Anger is John Abraham! The reason is 'atomic' !! | ​नाराज आहे जॉन अब्राहम! ‘परमाणु’ आहे कारण!!

​नाराज आहे जॉन अब्राहम! ‘परमाणु’ आहे कारण!!

googlenewsNext
न अब्राहम दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. चित्रपटगृहात जॉनचा चित्रपट येऊन बराच काळ लोटलाय.  अशास्थितीत जॉनला लगेच अ‍ॅक्टिव्ह होणे गरजेचे आहे. खरे तर जॉनचा ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट बनून तयार आहे. पण या चित्रपटालाही ग्रहण लागले आहे. दुस-या चित्रपटांसोबतचा बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी जॉनच्या या चित्रपटाची रिलीज डेट तिसºयांदा लांबणीवर टाकण्यात आली आहे.  साहजिक जॉन यामुळे संतापला आहे.
सर्वप्रथम हा चित्रपट ८ डिसेंबर २०१७ रोजी ‘परमाणु’ रिलीज होणार होता. पण तेव्हा संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ची रिलीज डेट जवळ असल्याच्या कारणावरून ‘परमाणु ’ला लांबणीवर टाकले गेले होते. अर्थात ‘पद्मावत’ काही रिलीज झाला नाही आणि त्याच्या वादात ‘परमाणु ’चा मात्र खोळंबा झाला. यानंतर या चित्रपटासाठी २३ फेबु्रवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.   पण राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘बूम बूम इन न्यूयॉर्क’ पुन्हा या चित्रपटाच्या मार्गात आला. यामुळे ‘परमाणू’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. साहजिकचं या वारंवार लांबणीवर पडणाºया रिलीज डेटमुळे जॉन बिथरला नसेल तर नवल. चर्चा खरी मानाल तर सध्या जॉन चांगलाच संतापला आहे. वारंवार रिलीज डेट टळत असल्याबद्दल तो नाराज आहे.
 आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी. या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी ३ अणुस्फोट घडवून आणलेत गेले होते. यानंतर १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणले गेले होते. यास ‘आॅपरेशन शक्ती’ या नावाने ओळखले जाते.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या देखरेखीखाली  या चाचण्या झाल्या होत्या. 

Web Title: Anger is John Abraham! The reason is 'atomic' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.