Anil Kapoor: एकेकाळी परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; या चिपटानं नशीब बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:53 AM2022-12-24T11:53:46+5:302022-12-24T12:12:06+5:30
अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो या व्यक्तिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही त्याची प्रॉपर्टी आहे.
बॉलिवूडचा 'मिस्टर इंडिया' म्हणजेच सुपरस्टार अनिल कपूर(Anil kapoor) ची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये केली जाते. साठीतही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे.अनिल कपूर आज आपला ६६वा वाढदिवस (Anil Kapoor Birthday) साजरा करतो आहे, मात्र यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. अनिल कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत, पण इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. हे स्थान मिळवण्यासाठी अनिलने जीवनात अनेक अडचणींचा सामना केला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित एक खास गोष्ट सांगणार आहोत.
अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो. पण, तुम्हाला माहित आहे का की, अनिल कपूर व्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही फ्लॅट आहे. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा त्याला परिवारासोबत एका छोट्याशा गॅरेजमध्ये राहावे लागत होते. होय, जेव्हा अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूर परिवाराला घेवून मुंबईत आले होते, तेव्हा ते त्यांच्या परिवारासमवेत गॅरेजमध्ये राहत होते. आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनिल कपूरने शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘तेजाब, मिस्टर इंडिया, विरासत, पुकार, ईश्वर, स्लमडॉग मिलिनेयरसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र हे वैभव मिळविण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.
अनिल कपूरचे आयुष्य सुरुवातीपासून सुखासमाधानाचे आणि चैनीचे होते असे नाही. जेव्हा अनिल कपूरचे वडील परिवाराला घेऊन मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. अशात त्यांनी परिवारासमवेत गॅरेजमध्ये निवारा शोधला. बरेच दिवस त्यांना गॅरेजमध्ये काढावे लागले. होय, अनिल कपूरचे वडील परिवारासमवेत एकेकाळी शो मॅन राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होते. अतिशय कष्ट करून त्यांनी पुढे यश मिळविले.
काही दिवस गॅरेजमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी एका सर्वसामान्यांच्या वसाहतीत एक खोली भाड्याने घेतली. पुढे सुरेंद्र कपूर यांनी आपल्या परिवाराला चांगले जीवन देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरेंद्र कपूर दिग्दर्शक होते. पुढे त्यांनी मुलगा अनिललाही इंडस्ट्रीत आणले. अनिलने मुख्य अभिनेता म्हणून १९८० मध्ये एका तेलगू चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. अनिलने 1983 मध्ये 'वो सात दिन' या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अनिल कपूर एकामागून एक यशाच्या पायऱ्या चढत राहिला आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.