झक्कास! अनिल कपूरने दिला मदतीचा हात, फार्मा कंपनीसोबत मिळून 1 कोटीचे दान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:51 PM2021-05-12T14:51:27+5:302021-05-12T14:58:48+5:30
राज्यातील कोरोना लढ्यात खंड पडू नये यासाठी अभिनेता अनिल कपूर मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करत आहे.
कोरोना संकटात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आता अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor ) यानेही कोरोना काळात मदतीचा हात पुढे करत एका फार्मा कंपनीसोबत मिळून 1 कोटी रूपयांची देणगी देऊ केली आहे.
अनिल कपूर हे 1 कोटी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister's Relief Fund-COVID 19)दान करणार आहे. अनिल कपूरने मॅनकाइंड या फार्मा कंपनीसोबत मिळून सीएम रिलीफ फंडात 1 कोटी रूपयांचे योगदान देणार आहे. अनिलने एका पोर्टलसोबत बोलताना खुद्द ही माहिती दिली.
‘एका चांगल्या कामासाठी मी मॅनकाइंड फार्मासोबत हातमिळवणी केली, याचा मला आनंद आहे. या कठीण काळात मॅनकाइंड फार्मा समाजाच्या मदतीसाठी काम करतेय आणि आपल्या क्षमतेनुसार योगदान देत आहे,’ असे त्याने सांगितले.
मॅनकाइंडच्या एमडीने सांगितले की, सीएम रिलीफ फंडात 1 कोटींची देणगी समाजासाठी आमची छोटीशी मदत आहे. अनिल कपूर या कामी आमच्यासोबत आलेत, याचा आम्हाला आनंद आहे.
कोरोनाकाळात अनेक सेलिब्रिटी मदत करत आहेत. सोनू सूद, अजय देवगण, अमिताभ बच्चन यासारखे सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सारा अली खानने अलीकडे सोनूच्या फाऊंडेशनला देणगी दिली होती. सोनू सूद आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून असंख्या लोकांना मदत करतोय. सलमान खानने गरजूंच्या भोजनाचा भार उचलला असून बॉलिवूड इंडस्ट्रीच्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदतीचा विडा त्याने उचलला आहे.